४४व्या वर्षी शिल्पा शेट्टी बनली दुसऱ्यांदा आई!

बी टाऊन
Updated Feb 21, 2020 | 17:45 IST | चित्राली चोगले

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी पुन्हा एकदा गुड न्यूज ऐकायला मिळाली आहे. नुकतच शिल्पाच्या घरी एका गोंडस परीचं आगमन झालं असून शिल्पा दुसऱ्यांदा आई बनली आहे. ही बातमी तिने नुकतीच सोशल मीडियावरून जाहीर केली आहे.

actress shilpa shetty kundra welcomes her second child after 7 years declares the news through social media raj kundra
४४व्या वर्षी शिल्पा शेट्टी बनली दुसऱ्यांदा आई!  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • शिल्पा शेट्टी बनली दुसऱ्यांदा आई
  • शिल्पा आणि राजच्या घरी गोंडस मुलीचं झालं आगमन
  • सोशल मीडियावरुन जाहीर केली बातमी

मुंबई: बॉलिवूडची फिटनेस फ्रीक असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा गुड न्यूज ऐकायला मिळाली आहे. शिल्पा आणि पती राज कुंद्रा यांच्याघरी एका गोंडस परीचं आगमन झालं आहे. सात वर्षांनी पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी आई बनली आहे. ही बातमी ऐकून अनेकांना आनंद तर झालाच आहे पण अनेकांना याचं आश्चर्य देखील वाटत आहे. या मागचं कारण आहे शिल्पा शेट्टी प्रेग्नंट असल्याचं अनेकांना माहितीच नव्हतं.

शिल्पा प्रेग्नेंट असल्याची माहिती असणं शक्यच नाही कारण शिल्पा दुसऱ्यांदा आई बनली आहे ते सरोगसीद्वारे. त्यामुळे याबद्दल माहिती नसलेल्यांना याचं आश्चर्य होणे सहाजिक आहे. सरोगसीद्वारे जन्माला आलेल्या शिल्पाच्या मुलीचा जन्म 15 फेब्रुवारी रोजी झाला असून आज महाशिवरात्रीचं निमित्त साधत ही बातमी शिल्पाने तिच्या सोशल मीडिया वरून जाहीर केली आहे.

 

 

शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक गोंडस फोटो टाकत त्याला कॅप्शन दिलं, 'आमच्या प्रार्थनांना एका चमत्काराच्या रूपात उत्तर मिळालं आहे. मनात कृतज्ञता ठेवून आमच्या छोट्याशा परीचं आगमन झाल्याचं जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. समिशा शेट्टी कुंद्रा. या ज्युनियर SSK चा जन्म 15 फेब्रुवारी 2020 रोजी झाला.' शिल्पाच्या या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळत असून अवघ्या काही वेळातच या पोस्टला पाच लाखांच्या घरात लाइक्स मिळाले आहेत.

 

 

शिल्पा सारखाच आनंद तिचा पती राज कुंद्राला सुद्धा झाला आहे आणि तो त्याने एका पोस्टमध्ये व्यक्त केला, ज्यात तो म्हणाला, 'मी सांगू शकत नाही की मी किती आनंदात आहे हे जाहीर करताना की आमच्या कुटुंबात एका नवीन सदस्याचं आगमन झालं आहे, शमिशा शेट्टी कुंद्रा या आमच्या मुलीचा जन्म झाला आहे...' 

 

 

 

 

2009 साली लग्न झालेल्या शिल्पा आणि राज यांची ही दुसरी मुलगी असून 2012 साली त्यांना वियान या नावाचा पहिला मुलगा झाला होता. 2020 हे वर्ष शिल्पासाठी लकी म्हणावं लागेल कारण तिच्या मुलीच्या आगमना सोबतच तब्बल 13 वर्षांच्या ब्रेकनंतर ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर निकम्मा या सिनेमातून अवतरणार आहे. याशिवाय ती लवकरच हंगामा २ या सिनेमात सुद्धा झळकताना दिसेल.

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...