अभिनेत्री श्वेता साळवेनी पतीचे चुंबन घेतांनाचे फोटो केले शेअर, पाहा चाहत्यांच्या प्रतिक्रिया

बी टाऊन
Updated May 21, 2020 | 10:32 IST | टाइम्स नाऊ हिंदी

टीव्ही अभिनेत्री श्वेता साळवेने तिचा पती हरमीत सेठी याच्यासोबत चुंबन घेतानांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Actress Shweta Salve Shares her photo while kissing husband on Social media
श्वेता साळवे आणि हरमीत सेठी  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • टीव्ही अभिनेत्री श्वेता साळवेनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले.
  • नवऱ्याचे चुबंन घेतानाचे फोटो केले शेअर
  • चाहत्यांनी लव्ह बर्ड म्हणत फोटो केले शेअर

मुंबई: कोरोना व्हायरसमुळे मागील दोन महिन्यापासून देशभरात सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. सर्वसामान्यांपासून टीव्ही कलाकारांपर्यंत सर्व लोक घरात आपला वेळ व्यतित करत आहे. सर्वसामान्य लोकांसह कलाकारही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर अॅक्टीव्ह दिसत आहे. टीव्ही सिरिअल्समध्ये दिसणारी श्वेता साळवे ही अभिनेत्री इंस्टाग्रामवर खूप अॅक्टीव्ह दिसते. ती तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे फोटो नेहमी इंस्टाग्रामवर शेअर करत असते.  नुकताच श्वेताने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला त्या फोटोची मोठ्या प्रमाणावर चर्चा देखील रंगत आहे. या फोटोत श्वेता तिचा पती हरमीत सेठीचे चुंबन घेत आहे. 

https://www.instagram.com/shveshve/?utm_source=ig_embed

हा फोटो अतिशय बोल्ड असून अनेक चाहत्यांनी या फोटोला पसंती दर्शवली आहे. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, हा फोटो खूपच छान आहे. तर काही चाहत्यांनी श्वेता आणि हरमीतच्या फोटोवर त्यांना 'लव्ह बर्ड्स' म्हटले आहे. श्वेताने २००९ साली हरमीत सेठीला डेट करायला सुरुवात केली होती. तीन वर्षांच्या प्रेम संबधांनंतर दोघांनी २०१२ साली लग्न केले होते. लग्नाच्या जवळपास चार वर्षानंतर  त्यांना मुलगी झाली. या मुलीचे नाव आर्या असे ठेवण्यात आले.

https://i.timesnowhindi.com/shveta_salve.jpg

श्वेताने टीव्ही मालिकांमधून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. टीव्ही सिरिअल 'एक था चंदर और एक थी सुधा पासून तिची अॅक्टींग प्रेक्षकांना बघायला मिळाली. त्यानंतर हिप हिप हुर्रे, किटी पार्टी सारख्या टीव्ही शोज् मध्येही तिने काम केले. याशिवाय श्वेता २००६ साली 'झलक दिखला जा'च्या पहिल्या सीझनमध्ये, 'खतरो के खिलाडी'च्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसली होती. श्वेता साळवेचा पती हरमीत हा स्टाइलिस्ट आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक आहे.

https://www.instagram.com/hermitsethi/?utm_source=ig_embed
https://www.instagram.com/shveshve/?utm_source=ig_embed
https://www.instagram.com/shveshve/?utm_source=ig_embed

        
या शिवाय हरमीत आणि श्वेता साळवेचे गोव्यात एक रेस्टॉरंट देखील आहे. लग्नानंतर श्वेताने फिल्मी जगताशी असलेले नाते तोडून टाकत करिअरला पूर्णविराम देत कुटुबांला वेळ देण्याचे ठरविले.    

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी