Salman Khan: सलमानसोबतचे माझे नाते संपल्यानंतर मी पूर्णपणे तुटले होते; एकेकाळी गर्लफ्रेंड असलेल्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा

बी टाऊन
Updated Jan 06, 2022 | 20:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Salman Khan Girlfriend | सलमान खान आणि सोमी अली यांचे नाते जगजाहीर आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान सलमान खानचा १९८९ मध्ये 'मैने प्यार किया हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर त्याचे चाहते जगभरात लाखोंच्या संख्येने पोहोचले होते. सलमानचा चाहता वर्ग एवढा होता की वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सोमी अली त्याच्यावर फिदा झाली होती.

Actress Somy Ali's big revelation that I was completely broken after my relationship with Salman ended
सलमान खानच्या माजी गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सलमान खान आणि सोमी अली यांचे नाते जगजाहीर आहे.
  • जेव्हा सलमानने सोमीला आय लव्ह यू म्हटले होते तेव्हा ती १७ वर्षांची होती.
  • सलमानने माझी फसवणूक केली आहे, त्याच्याशी माझे नाते संपुष्टात आल्यानंतर मी पूर्णपणे तुटले आणि भारतातून अमेरिकेला परत गेली. असे सोमीने सांगितले.

Salman Khan EX Girlfriend Somy Ali | नवी दिल्ली : सलमान खान आणि सोमी अली (Salman Khan And Somy Ali) यांचे नाते जगजाहीर आहे. बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actors) सलमान खानचा (Salman Khan) त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच मोठा चाहता वर्ग (Fan Following) आहे. दरम्यान सलमान खानचा १९८९ मध्ये 'मैने प्यार किया हा चित्रपट (Movie)  प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर त्याचे चाहत्यात जगभरात लाखोंची भर पडली होती.   (Actress Somy Ali's big revelation that I was completely broken after my relationship with Salman ended). 

सलमानचा चाहता वर्ग एवढा होता की वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी सोमी अली त्याच्यावर फिदा झाली होती. जेव्हा सोमीने सलमानचा पहिला चित्रपट मैंने प्यार किया पाहिला तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडली. १९९० च्या दशकात सलमानचे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट येत होते. तेव्हाच सोमी अलीने सलमान खानशी लग्न केल्याचा विचार केला होता. त्यासाठी ती सर्व काही सोडून अमेरिकेतून मुंबईत (From America to Mumbai) आली होती.

अलीकडेच सोमीने फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले की ती १६ वर्षांची होती जेव्हा तिने सूरज बडजात्याचा मैने प्यार किया हा चित्रपट पाहिला होता. तेव्हाच सलमानशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सलमान तिचा पहिला क्रश होता. तिने सांगितले की, ती वॉलेटमध्ये सलमान खानचा फोटो ठेवायची. ती भारतात आली तेव्हा सलमान खानचा पुढचा चित्रपट बागी प्रदर्शित झाला होता. सलमान खान त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच मेगास्टार बनला होता.

दरम्यान, सोमी अलीनेही बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि सलमान खानसोबत एका चित्रपटात काम केले. सोमी आणि सलमान खानच्या प्रेमसंबंधाच्या सुरुवातीचे काही किस्से सोमीने सांगितले आहेत. ती म्हणाली की, ती नेपाळला जात असताना सलमान तिच्या शेजारी बसला होता. सलमानला पाहून तिने त्याचा फोटो लपवला. ती म्हणाला की मी तुझ्याशी लग्न करायला भारतात आली आहे. सोमीचे म्हणणे ऐकून सलमानने उत्तर दिले की, माझी आधीपासूनच एक प्रेयसी आहे. हे सर्व असून देखील मी १७ वर्षांची झाल्यावर एका वर्षानंतर आमचे नाते सुरू झाले, असे सोमीने आणखी म्हटले. 

सोमीने सांगितले की, जेव्हा सलमानने तिला आय लव्ह यू म्हटले होते तेव्हा ती १७ वर्षांची होती. टीन एजमध्‍ये सलमानच्‍या प्रेमाची भावना ऐकून ती थक्क झाली होती. सोमीने सांगितले की, तिचे सलमानसोबतचे नाते दहा वर्षे टिकले, यादरम्यान ती सलमानच्या घरी ये-जा देखील करायची. 

तसेच सलमानच्या कुटुंबाचे कौतुक करताना सोमी म्हणाली की, सलमानचे आई-वडील खूप चांगले आहेत आणि त्यांच्या घरी जाऊन खूप काही शिकायला मिळाले. तिथे धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जात नाही. मात्र अलीकडेच झूमच्या माध्यमातून संवाद साधताना सोमीने म्हटले की, सलमानने माझी फसवणूक केली आहे. त्याच्याशी माझे नाते संपुष्टात आल्यानंतर मी पूर्णपणे तुटले आणि भारतातून परत गेली. सलमानसोबतचे माझे नाते संपुष्टात आल्यानंतर मी परत अमेरिकेला गेले आणि तिथे नो मोअर टियर्स नावाच्या एनजीओसोबत काम करत आहे. असे सोमीने सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी