कॅन्सरशी दोन हात केल्यानंतर सोनाली करतेय ‘हा’ खास व्यायाम

बी टाऊन
Updated Jun 11, 2019 | 13:39 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

कॅन्सर झाल्याचं कळल्याबरोबर सोनाली बेंद्रेनं न्यूयॉर्कमध्ये आपली ट्रीटमेंट पूर्ण केली. आता ती पूर्णपणे बरी झालेली आहे. तिनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती खास व्यायाम करतांना दिसतेय.

Sonali Bendre
सोनालीचा नवा खास व्यायाम  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेसाठी गेलं वर्ष खूप कठीण होतं. २०१८ मध्ये तिला कॅन्सर झाल्याचं समोर आलं. त्यानंतर तिनं थेट न्यूयॉर्क गाठलं. तिथं तिनं कॅन्सरवर ट्रिटमेंट घेतली. विशेष म्हणजे या वेदनादायक ट्रिटमेंटमध्ये तिनं आपलं चेहऱ्यावरील हास्य कमी होऊ दिलं नाही. तिला झालेल्या यातना आणि तिचा कॅन्सरशी लढ्याचा प्रवास तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यातून आपल्या फॅन्समध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न सोनालीनं केला. आता ती कॅन्सरमुक्त झाली आहे, पण आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन ती आपल्या फॅन्स आणि फॉलॉअर्सना कॅन्सरविरोधात जागरूक करत आहे.

सोनालीनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती अॅक्वा थेरपी घेतांना दिसत आहे. ही पाण्यात केली जाणारी एक्सरसाईज आहे. हा व्यायाम तसा कठीण आहे पण नॉर्मल कंडिशनमध्ये सहज करता येऊ शकते, अशी माहिती सोनालीनं या व्हिडिओमध्ये दिली आहे. तसंच तिनं आपल्या व्हिडिओला कॅप्शनही दिलं आहे. Warning: ही एक्सरसाईज दिसतांना सोपी दिसत आहे पण तितकी सोपी नाही. माझी ही नवीन अॅक्वा थेरपी सेशन कठीण आहे. पण हो सामान्य परिस्थितीत ही थेरपी करणं नक्कीच सोपी आहे. माझ्या या नव्या सामान्य स्थितीमध्ये समाधान शोधणं आणि कोणतीही कारण न देणं हे सहभागी आहे. नशीब, देवाचे आभार की मी माझा फोन पाण्यात नाही पाडला.

 

 

सोनावी बेंद्रेला कॅन्सर झाला ही बातमी पसरायला वेळ लागला नाही. तिच्या कुटुंबियांबरोबरच फॅन्सनाही खूप टेंशन आलं होतं. पण सोनालीनं हार मानली नाही. आणि नेहमीप्रमाणे तिनं फायटिंग स्पिरीट दाखवत याचाही सामना केला. तिनं किमोथेरपीबद्दलही सांगितलं. कॅन्सर ट्रिटमेंटमध्ये तिचे केसही संपूर्ण गेले होते. पण आता सर्व ठीक आहे. नुकताच तिनं नवीन हेअर कटही केला आहे.

 

 

या हेअरकटमुळं तिचा संपूर्ण मेकओव्हर झाला आहे. तिनं या हेअरकटचाही व्हिडिओ शेअर केला आहे. तिला हा नवीन लूक Tomohiro यांनी दिला आहे. न्यूयॉर्कवरून भारतात ब्रेकसाठी आले होते. त्यांच्या व्यस्त शेड्युल्डमधून वेळ काढून त्यांनी सोनालीचा मेकओव्हर केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
कॅन्सरशी दोन हात केल्यानंतर सोनाली करतेय ‘हा’ खास व्यायाम Description: कॅन्सर झाल्याचं कळल्याबरोबर सोनाली बेंद्रेनं न्यूयॉर्कमध्ये आपली ट्रीटमेंट पूर्ण केली. आता ती पूर्णपणे बरी झालेली आहे. तिनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती खास व्यायाम करतांना दिसतेय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles