स्पृहा जोशीकडून खास मेजवानी, संपूर्ण युनिटसाठी चिकन करीचा बेत

बी टाऊन
Updated Nov 07, 2019 | 15:39 IST | चित्राली चोगले

अभिनेत्री स्पृहा जोशीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खास चिकन करी बनवताना दिसते आणि ती तिने तिच्या ‘रंगबाझ’च्या संपूर्ण टीमसाठी सेटवर बनवली आहे.

actress spruha joshi does special cooking for the entire team of upcoming rangbaaz web series on its set
‘रंगबाझ’च्या सेटवर स्पृहा जोशीची खास मेजवानी, संपूर्ण युनिटसाठी केला चिकन करीचा बेत  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • 'रंगबाझ' टीमसाठी स्पृहा जोशीचं खास सरप्राईज
  • संपूर्ण टीमसाठी केला चिकन करी आणि भेडीच्या भाजीचा बेत
  • जेवण बनवतानाचा व्हडिओ खुद्द स्पृहाने केला शेअर

मुंबई: अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या सूर नवा ध्यास नवा या सुरेल कार्यक्रमातून आपल्या भेटीला येताना दिसत आहे. त्याचसोबत तिची इतर अनेक कामं सुद्धा सुरु आहेत. मराठीतली ही गुणी अभिनेत्री लवकरच आगामी हिंदी वेबसीरिज रंगबाझमध्ये सुद्धा झळकणार आहे. गेले काही दिवस आपल्या याच आगामी हिंदी वेबसीरिजच्या शूटिंगमध्ये ती व्यस्त होती. रंगबाझ ह्या स्पृहाच्या नव्या वेबसीरिजचे शूट मध्यप्रदेशमधील भोपाळ आणि चंदेरीमध्ये पार पडत होतं. नुकताच या सेटवरचा एक खास व्हिडिओ स्पृहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. रंगबाझच्या शूटच्या शेवटच्या दिवसाचा हा व्हिडिओ असून त्यात स्पृहा रंगबाजच्या शूटच्या शेवटच्या दिवशी खास काहीतरी करताना दिसते. स्पृहाने संपूर्ण टीमसाठी मस्त मेजवानीचा घाट घातला.

मध्यप्रदेशच्या चंदेरीमध्ये रंजबाझची टीम राहत असलेल्या किला कोठी हॉटेलध्येच स्पृहाने सर्वांसाठी फक्कड जेवण बनवले. स्पृहाने छान चिकन करी आणि मस्त भेंडीच्या भाजीचा घाट घातला. रंगबाझच्या युनिटमधल्या शाकाहारींनी स्पृहाच्या हातच्या चविष्ट भेंडीच्या भाजीवर ताव मारला. तर मांसाहारी मंडळींनी चिकन करी फस्त केली. आपल्या हातचे जेवण सगळ्यांना आवडल्याचे दिसल्यावर स्पृहाचाही चेहरा फुलला. हीच सगळी मेजवानी तयार करत असतानाचा स्पृहाचा व्हिडिओ कोणीतरी शूट केला आणि तोच तिने नंतर शेअर केला. या व्हिडिओला तिच्या फक्त इन्स्टाग्राम अकाऊंटवर तब्बल १ लाख ७५ हजारांच्यावर लाईक्स आले आहेत.

 

 

हा व्हिडिओ शेअर करत स्पृहाने एक पोस्ट लिहीली आहे ज्यामध्ये ती म्हणते, “काल ' रंगबाझ' च्या शूटिंगचा माझा शेवटचा दिवस होता. या अवघ्या काही दिवसात या गोड टीमसोबत एक लाघवी नातं निर्माण झालं आहे. इथून मुंबईला परत जाण्याआधी विचार केला या सगळ्यांसाठी काहीतरी स्पेशल करावं. तर इथे चंदेरीच्या होटेल 'कीला कोठी'च्या किचनवर कब्जा केला. संपूर्ण स्टाफने खूप मदत केली. खूप आनंद झाला की मला जेवण बनवण्यात जितका आनंद मिळाला तितक्याच प्रेमाने सगळ्यांनी ते जेवण खाल्लं आणि त्याची प्रशंसा सुद्धा केली. बस! जेवण बनवता बनवता माझा दिवस सुद्धा छान गेला.”

 

 

या पोस्ट आणि या खास मेजवानीबद्दल खुद्द स्पृहाला अधिक विचारता ती म्हणाली, “गेले कित्येक महिने आम्ही रंगबाझसाठी मेहनत घेत होतो. ह्या काळात एकमेकांसोबत भोपाळ, चंदेरी आणि मध्यप्रदेशच्या इतर भागांमध्ये चित्रीकरणा दरम्यान आम्ही सर्वच कलाकारांनी खूप वेळ एकत्र घालवला होता. त्यामुळे सर्वांसोबतच माझे जिव्हाळ्याचे संबंध झाले. ह्या सर्वांसाठी काहीतरी स्पेशल करावंस वाटलं. त्यामुळेच चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी माझ्या हातचं काहीतरी सर्वांना बनवून खायला घालावं, असं मनातं आलं. आणि मग शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा मी घाट घातला. मला सर्वांसाठी प्रेमाने जेवण बनवायचा जेवढा आनंद झाला. त्यापेक्षा जास्त आनंद सर्वजण पोटभर जेवून, तृप्त झाल्यावर वाटला.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी