Urfi Javed Health Update: उर्फी जावेदला झालंय तरी काय? थेट रुग्णालयात झालीए दाखल

Urfi Javed Hospitalised: उर्फी जावेद तिच्या विचित्र ड्रेसिंगमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. पण मागील काही दिवसांपासून तिची प्रकृती बरी नसल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

actress urfi javed has been ill for many days be admitted to hospital
उर्फी जावेदला झालंय तरी काय? रुग्णालयात झालीए दाखल  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • उर्फी जावेद रुग्णालयात दाखल
  • गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरुन गायब आहे उर्फी
  • उर्फी अनेक दिवसांपासून आहे आजारी

Urfi Javed: मुंबई: इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) ही नेहमीच सोशल मीडियात (Social Media) चर्चेत असते. ती तिच्या खास फॅशन सेन्समुळे (Fashion Sense) अनेकदा ट्रोल देखील होते. पण आता उर्फीची पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नव्हे तर तिच्या खराब तब्येतीमुळे सोशल मीडियात चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उर्फीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Actress urfi javed has been ill for many days be admitted to hospital)

वास्तविक, नुकतीच उर्फी जावेदची तब्येत खराब असल्याची बातमी समोर आली होती. खूप ताप आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारीनंतर तिला मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल (Urfi Javed Hospitalised) करण्यात आले होते. ही बातमी समोर आल्यापासून तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. उर्फीचे काय झाले हे लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अधिक वाचा: Urfi Javed topless photoshoot: उर्फी जावेदचं टॉपलेस फोटोशूट पाहून व्हाल घायाळ, पाहा VIDEO

उर्फीने स्वतः एक फोटो शेअर करताना रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली होती. या फोटोसोबत उर्फीने लिहिले आहे की, 'मला इथे राहून खूप दिवस झाले आहेत. मी माझ्या तब्येतीकडे सतत दुर्लक्ष करत होते आणि आता..' 

आपल्या या पोस्टमध्ये उर्फीने रुग्णालयात दाखल होण्याचं नेमकं कारण सांगितलेलं नाही. पण तिने जे काही कॅप्शनमध्ये लिहिलं आहे त्यावरुन असं लक्षात येतं की, तिची जी काही प्रकृती बिघडली आहे त्याला ती स्वत:च कारणीभूत आहे. कारण ती तिच्या आरोग्याकडे खूपच दुर्लक्ष करत होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Uorfi (@urf7i)

सोशल मीडियावर असते खूपच अॅक्टिव्ह

उर्फी जावेद अनेकदा त्याच्या विचित्र ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. तिच्या कपड्यांची निवड (Urfi Javed Fashion Sense)चाहत्यांना प्रत्येक वेळी धक्का देत असते. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यापासून सोशल मीडियावर तिचा एकही फोटो पाहायला मिळत नाहीए. अशा परिस्थितीत उर्फीच्या उत्तम आरोग्यासाठी तिच्या हितचिंतकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

अधिक वाचा: Tv Actress Urfi Javed: Ufff..! रणवीर सिंगची दुसरी बेगम व्हायला आवडले: उर्फी जावेद

अलीकडे उर्फी अभिनेत्री चाहत खन्नासोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आली होती. अलीकडेच चाहत खन्नाने तिच्या ड्रेसिंग सेन्सवर कमेंट केली होती, ज्यावर उर्फी भडकली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी