डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे खराब झाला अभिनेत्रीचा चेहरा, सोशल मीडियावर डॉक्टरला फटकारले

बी टाऊन
Updated Apr 19, 2021 | 11:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रायजा विल्सन ही डॉक्टरकडे सिंपल फेशिअल करवून घेण्यासाठी गेली होती. मात्र क्लिनिकच्या डॉक्टरांनी तिला एका वेगळ्या ट्रीटमेंटबद्दल सांगितले आणि ती करून घेण्यासाठी आग्रह केला.

Actresss face destroyed due to doctor’s negligence actress slams doctor on social media
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे खराब झाला अभिनेत्रीचा चेहरा   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • सिंपल फेशिअल करण्यासाठी गेली होती रायजा
  • इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून सांगितली घटना
  • चाहत्यांच्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट केले शेअर

नवी दिल्ली: टीव्हीवरील (TV) अभिनेत्री (actresses) असोत किंवा चित्रपटसृष्टीतील (film industry) अभिनेत्री, त्यांच्यासाठी त्यांचा चेहरा (face) हा फारच खास (special) असतो. त्यामुळे त्या आपल्या चेहऱ्याची खूप काळजी (care) घेतात. असे असताना जर एखाद्या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर डॉक्टरांच्या (doctor) निष्काळजीपणामुळे (negligence) वाईट परिणाम (bad effects) झाला तर त्यांची काय अवस्था होत असेल याचा विचारही करवत नाही. असाच काहीसा प्रसंग तमिळ अभिनेत्री (Tamil actress) रायजा विल्सनवर (Raiza Wilson) ओढवला. ती डर्मॅटॉलॉजिस्टकडे (dermatologist) आपला इलाज (treatment) करण्यासाठी गेली होती, पण असे काही झाले ज्यामुळे ती डॉक्टरवर भडकली.

सिंपल फेशिअल करण्यासाठी गेली होती रायजा

तमिळ अभिनेत्री रायजा विल्सन ही डॉक्टरांकडे आपले सिंपल फेशिअल करण्यासाठी गेली होती. पण क्लिनिकमध्ये डॉक्टरांनी तिला एका वेगळ्या ट्रीटमेंटबद्दल सांगितले आणि ती करवून घेण्यासाठी तिला आग्रह केला. जेव्हा रायजाने ही ट्रीटमेंट केली तेव्हा तिचा चेहरा पूर्णपणे खराब झाला. आता तिने सोशल मीडियावर पोस्ट करून ही घटना सांगितली आहे आणि डॉक्टरांवरही तिने हल्ला चढवला आहे.

Tamil actor Raiza Wilson blasts dermatologist for allegedly forcing her to  undergo a dermatological procedure, shares pic after it goes wrong | Tamil  Movie News - Times of India

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून सांगितली घटना

रायजाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये आपला एक फोटो शेअर केला आहे. यात तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांच्या खाली बरीच सूज आल्याचे दिसत आहे. यात तिने लिहिले आहे, '@drbhairavisenthil यांना काल एका सिंपल फेशिअलसाठी भेटले, त्यांनी मला एक फेशिअल प्रक्रिया करण्यास सांगितले ज्याची मला गरज नव्हती आणि आता हा परिणाम आहे. त्या आज मला भेटायला किंवा माझ्याशी बोलायला तयार नाहीत. स्टाफ सांगत आहे की त्या शहराबाहेर आहेत.' तिने हे उपचार घेण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोपही तिने केला आहे.

चाहत्यांच्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट केले शेअर

याशिवाय रायजाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या चाहत्यांच्या मेसेजेसचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. यासोबत तिने लिहिले आहे, 'माझा इनबॉक्स त्या लोकांच्या मेसेजेसनी भरून गेला आहे ज्यांनी त्याच डर्मॅटॉलॉजिस्टकडे उपचार घेतले आणि त्यानंतर त्यांनाही वाईट परिणाम दिसून आले.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी