Big Films of 2022: आदिपुरुष, पृथ्वीराज ते ब्रह्मास्त्र आणि गंगुबाई काठियावाडीपर्यंत, बिग बजेट, बिग बॅनर फिल्म्स 2022 मध्ये रिलीज होणार

Bollywood films of 2022: जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत बॉलिवूडच्या बिग स्टार्सचे सिनेमा रिलीज होणार आहेत. तेव्हा एक आढावा घेऊया 2022 मध्ये रिलीज होणाऱ्या बिग बजेट, बिग बॅनर सिनेमांचा

Bollywood's big films of 2022
नव्या वर्षात बिग स्टार्सच्या बिग बजेट फिल्म्स रिलीज होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • खिलाडी कुमार अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' २१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  • 2022 मध्ये सिनेमांच्या रिलीजची सुरुवात बाहुबली प्रभासच्या 'राधे श्याम' या चित्रपटाने होणार आहे.
  • आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'गंगूबाई काठियावाडी'देखील १८ फेब्रुवारीला झळकणार आहे.


Bollywood's big films of 2022: 2020 आणि  2021 ही दोन्ही वर्ष चित्रपटसृष्टीसाठी फारशी समाधानकारक नव्हती.कोरोनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. तर 2021 थोडंफार बरं होतं असं म्हणता येईल, कारण दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये सिनेमा रिलीज व्हायला सुरुवात झाली. मात्र, तरीही कोरोनाची भीती मनात ठेवूनच. त्यामुळे आता येणारे नवीन वर्ष, 2022 तरी सिनेसृष्टीसाठी चांगलं जाईल अशी अपेक्षा आहे. कारण, या वर्षात बॉलिवूडचे अनेक उत्कृष्ट सिनेमा रिलीजसाठी तयार आहेत. बिग बॅनर, बिग बजेट आणि बिग स्टारकास्ट असलेल्या या सिनेमांवर एक नजर टाकूया.


अक्षय कुमारचे चित्रपट (Akshay Kumar films in 2022)

21 जानेवारीला खिलाडी कुमार अक्षय कुमारचा पृथ्वीराज  (Prithviraj) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. 
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chillar) दिसणार आहे. अक्षय कुमारचा बच्चन पांडे (Bachchan Pandey) हा चित्रपट ४ मार्चला तर आनंद एल राय दिग्दर्शित रक्षाबंधन हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा राम सेतू हा चित्रपट २४ ऑक्टोबरला सिल्व्हर स्क्रीनवर झळकेल. 


प्रभासच्या सिनेमापासून होणार  नवीन वर्षाची सुरुवात (Prabhas Films in 2022)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

2022 मध्ये बाहुबली स्टार प्रभासच्या 'राधे श्याम' या चित्रपटाने चित्रपटांच्या रिलीजची सुरुवात होणार आहे. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे.याशिवाय प्रभासचा आदिपुरुष हा सिनेमाही ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओम राउत (Om Rout) दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटात प्रभाससोबत सैफ अली खान  (Saif Ali Khan),क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि सनी कौशा (Sunny Singh) दिसणार आहेत. 
हिंदू धर्मग्रंथ रामायणावर या सिनेमाची कथा आधारित आहे, ज्यामध्ये प्रभास श्री रामची भूमिका साकारणार आहे. दुसरीकडे सैफ अली खान लंकेशची भूमिका साकारणार असून क्रिती सेनन जानकीची भूमिका साकारणार आहे.

ब्रह्मास्त्र आणि गंगूबाई काठियावाड़ी (Alia Bhatt Films)

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) चा बहुप्रतिक्षित चित्रपट गंगूबाई काठियावाडी देखील 18 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्याचवेळी, अयान मुखर्जी दिग्दर्शित आलिया-रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होत आहे. दुसरीकडे, रणबीर कपूरचा शमशेराही 18 मार्चला रिलीज होणार आहे.


रणवीर सिंहच्या दोन फिल्मस रिलीज होणार (Ranveer singh Films)


आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगचे दोन चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होणार आहेत. जयेश भाई जोरदार हा त्याचा पहिला चित्रपट आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा दुसरा चित्रपट आहे. दोन्ही सिनेमांची प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.


'विक्रम वेधा' रीमेक (Hrithik Roshan Films)

साऊथचा सुपरहिट चित्रपट 'विक्रम वेधा'च्या (Vikram Vedha)हिंदी रिमेकची रिलीज डेट जाहीर झाली आहे. निर्मात्यांनी रिलीजसाठी 30 सप्टेंबर 2022 निश्चित केली आहे. 
सुपरस्टार हृतिक रोशन यात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


लाल सिंह चड्ढा (laal singh chaddha)

बॉलिवूड मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमीर खान आणि करीना कपूर यांच्या लाल सिंग चड्ढा हा सिनेमासुद्धा 2022मध्ये रिलीज होणार आहे. बैसाखीच्या मुहूर्तावर म्हणजेच 14 एप्रिल 2022 रोजी लाल सिंग चड्ढा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी