आठ वर्षांपूर्वी असं काही घडलं, ज्यामुळे आता स्वत:च्या बाबतीत गुगलवर सर्च करत नाही 'ही' अभिनेत्री

बी टाऊन
Updated May 16, 2019 | 22:10 IST | टाइम्स नाऊ हिंदी

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीनं नुकतंच ८ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितलं. ही अशी घटना आहे की, ज्यानंतर ती खूप घाबरली होती आणि तिनं आपल्याबद्दल गुगलवर सर्च करणंही सोडून दिलं होतं.

Aditi rao Hydari
अदिती राव हैदरी  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीनं नुकतंच सांगितलं की, ती गुगलवर आपला फोटो सर्च करत नाही. अदितीनं सांगितलं, २०११ मध्ये तिनं गुगलवर आपला फोटो सर्च केला होता, त्यानंतर जे तिला बघायला मिळालं त्यानंतर ती घाबरली होती आणि त्यानंतर तिने कधीही आपला फोटो पुन्हा गुगलवर सर्च केला नाही. असं काय घडलं होतं अदिती सोबत...

एका चॅट शो दरम्यान अदितीनं आपल्यासोबत घडलेल्या २०११ मधील घटनेबद्दल सांगितलं. अदितीनं सांगितलं की, २०११ साली तिचा रोमँटिक थ्रिलर चित्रपट ‘ये साली जिंदगी’ रिलीज झाला होता. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तिनं गुगलवर सर्च केलं, तर तिला गुगलवर सगळीकडे आपले बॅकलेस फोटो दिसले. ते पाहून अदितीला खूप धक्का बसला. अदितीनं पुढे सांगितलं, ‘एकदा मी गुगलवर स्वत:बद्दल सर्च केलं होतं आणि जे बघितलं ते आनंद देणारं नव्हतं. तिथं सगळीकडे माझ्या पहिल्या चित्रपटातील बॅकलेस फोटो होते.’ त्यानंतर अदितीनं आपल्या बद्दल गुगलवर सर्च करणं बंद केलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Since I love challenges, I decided to give this cube a try…

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari) on


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Life is short. Make each hair flip fabulous

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari) on

अदितीनं २००९ साली ओम प्रकाश मेहरा यांच्या ‘दिल्ली-६’ या चित्रपटामध्ये सपोर्टिंग रोलद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. याशिवाय अदितीनं विविध चित्रपटांत भूमिका केल्या आहेत ज्यामध्ये पद्मावत, भूमि, वजीर, बॉस आणि मर्डर-३ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आता लवकरच अदिती तमिळ चित्रपट ‘सायको’मध्ये दिसणार आहे. अदितीशिवाय या चित्रपटात उदयनिधी स्टालिन, नित्या मेनन आणि राम हे सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सायको सोबतच अदिती मोहन कृष्णन इंद्रगांती यांच्या ‘V’ या चित्रपटात दिसणार आहे. V चित्रपटात अदितीसोबत अभिनेते नानी, सुधीर बाबू आणि निवेथा थॉमस दिसणार आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Spotted

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari) on

अदिती राव हैदरी ही एक भारतनाट्यमची नृत्यांगणा आहे. तिनं आपल्या करिअरची सुरुवात नृत्यांगणा म्हणून केली होती. डान्स शिकण्यासाठी ती प्रसिद्ध भारतनाट्यम नृत्यांगणा लीला सॅमसन सोबत जोडली गेली. ती लीला सॅमसनच्या डांस ग्रुपचा भाग बनली होती. यासोबतच अदितीला गाण्याचीही आवड आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आठ वर्षांपूर्वी असं काही घडलं, ज्यामुळे आता स्वत:च्या बाबतीत गुगलवर सर्च करत नाही 'ही' अभिनेत्री Description: बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीनं नुकतंच ८ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितलं. ही अशी घटना आहे की, ज्यानंतर ती खूप घाबरली होती आणि तिनं आपल्याबद्दल गुगलवर सर्च करणंही सोडून दिलं होतं.
Loading...
Loading...
Loading...