अमिताभ बच्चननंतर आता अदनानी सामीचं ट्विटर अकाऊंट हॅक

बी टाऊन
Updated Jun 11, 2019 | 23:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूड एक्टर अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता सिंगर अदनान सामी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. त्यांच्या अकाऊंटवर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो अपलोड केला आहे. त्यांचा प्रोफाईल फोटो बदलण्यात आला आहे

adnan sami
अमिताभ बच्चननंतर आता अदनानी सामीचं ट्विटर अकाऊंट हॅक  |  फोटो सौजन्य: Instagram

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट सोमवारी हॅक करण्यात आलं. त्यानंतर आता सिंगर अदनान सामी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केलं गेलं आहे. अदनान यांचं अकाऊंट हॅक होताच त्यांचा प्रोफाईल फोटो, कव्हर फोटो आणि बायो बदलण्यात आला आहे. तसंच त्यांच्या अकाऊंटवरून पाकिस्तान समर्थनात ट्विट करण्यात आलं आहे. 

अदनान सामी यांच्या प्रोफाईल फोटोमध्ये त्यांच्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यांच्या कव्हर फोटोवर तुर्कस्तानचा झेंडा अपलोड केल्याचा दिसतोय. अदनान सामी यांच्या बायोमध्ये 'Ayyıldız Tim Love Pakistan' लिहिण्यात आलं आहे. इमरान यांचं अकाऊंट तुर्कस्तानच्या कोणत्यातरी प्रो-पाकिस्तान हॅकर ग्रुपनं हे अकाऊंट हॅक केलं आहे. अदनान सामी यांच्या आधी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर हॅंडल देखील अशाच अंदाजात हॅक झालं होतं. 

अदनान सामी यांचं अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यांच्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलं की, जो कोणी आमचा सहकारी देश पाकिस्तानची फसवणूक करण्याची हिंमत करेल, तो आपल्या प्रोफाईल फोटोमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान आणि इथल्या झेंडाचा फोटो बघाल. या ट्विटसोबत इमरान खान यांना देखील टॅग करण्यात आलं आहे. 

सोमवारी अमिताभ बच्चन यांचं अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं.  अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हे तुर्कीश सायबर आर्मी 'अयिल्दिज तिम' ने हे ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची माहिती समोर आली आहे. अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सने टर्की आणि पाकिस्तान संबंधित काही मेसेजेसही पोस्ट केले आहेत. इतकेच नाही तर ट्विटर अकाऊंटवरुन लव्ह पाकिस्तान असंही ट्विट करण्यात आलं. 

अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केल्यावर हॅकर्सने त्यांच्या प्रोफाईल फोटोच्या जागेवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला. त्यानंतर पोस्ट केलं, 'हा संपूर्ण जगासाठी एक महत्वपूर्ण संदेश आहे. तुर्कस्तानच्या फुटबॉलपटूंना आइसलँड रिपब्लिकने दिलेल्या वागणूकीचा आम्ही निषेध करतो.' यानंतर हॅकर्सने पुढे पोस्ट केलं की, 'एक मोठा सायबर हल्ला होणार आहे'. यानंतर त्यांनी आपला लोगो सुद्धा शेअर केला.

ab

त्यानंतर हॅक झालेल्या अकाऊंट हॅक झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पुन्हा ट्विट करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी गहन अर्थ असलेलं पहिलं ट्विट शेअर केलं.

त्यांच्या या पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘सिर्फ शब्दों से न करना, किसी के वजूद की पहचान...हर कोई , उतना कह नही पाता...जितना समझता और महसूस करता है...’ असं लिहिताच त्यांच्या फॉलोअर्सने यावर बऱ्याच कमेन्ट करत या सायबर हल्ल्याची निंदा केली. त्याचसोबत त्यांच्यावर असलेलं त्यांच्या चाहत्यांचं प्रेम सुद्धा या कमेन्ट्समधून पाहायला मिळालं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अमिताभ बच्चननंतर आता अदनानी सामीचं ट्विटर अकाऊंट हॅक Description: बॉलिवूड एक्टर अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता सिंगर अदनान सामी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. त्यांच्या अकाऊंटवर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो अपलोड केला आहे. त्यांचा प्रोफाईल फोटो बदलण्यात आला आहे
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली १० कोटींच्या जाहिरातीची ऑफर, जाणून घ्या कारण
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली १० कोटींच्या जाहिरातीची ऑफर, जाणून घ्या कारण
Box office: मिशन मंगल आणि बाटला हाऊस सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
Box office: मिशन मंगल आणि बाटला हाऊस सिनेमाचं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
[VIDEO] अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर साउथ सुपरस्टार प्रभासनं मौन सोडलं
[VIDEO] अनुष्का शेट्टीसोबतच्या रिलेशनशिपवर साउथ सुपरस्टार प्रभासनं मौन सोडलं
[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक
[VIDEO] शाहरूख खान लवकरच या सिनेमातून करणार कमबॅक
[VIDEO] : आलियाला लग्नाची मागणी घालताच रणबीर कपूर झाला भावूक
[VIDEO] : आलियाला लग्नाची मागणी घालताच रणबीर कपूर झाला भावूक
[VIDEO]: जाणून घ्या अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचं सीक्रेट
[VIDEO]: जाणून घ्या अभिनेता मिलिंद सोमण यांच्या फिटनेसचं सीक्रेट
Salman Khan Wedding: या २१ वर्षींय अभिनेत्रीला सलमानसोबत करायचंय लग्न, व्यक्त केली इच्छा
Salman Khan Wedding: या २१ वर्षींय अभिनेत्रीला सलमानसोबत करायचंय लग्न, व्यक्त केली इच्छा
Batla House: जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, पाहा तिसऱ्या दिवशी किती कमावला गल्ला
Batla House: जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, पाहा तिसऱ्या दिवशी किती कमावला गल्ला