Tanhaji Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर तान्हाजी सिनेमाची घौडदौड सुरूच, कमावले इतके कोटी

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Feb 20, 2020 | 15:26 IST

बॉलिवूड अॅक्टर अजय देवगणचा सिनेमा तान्हाजी सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमानं गोलमाल अगेनला मागे टाकलं आहे. 

Tanhaji Box office Collection
बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची घौडदौड सुरूच, कमावले इतके कोटी  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई  Tanhaji Box Office Collection: बॉलिवूड अॅक्टर अजय देवगणचा सिनेमा तान्हाजीः द अनसंग वॉरियरची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूत आहे. या सिनेमानं गोलमाल अगेनचा रेकॉर्ड ब्रेक करत नवा कीर्तिमान रेकॉर्ड स्थापित केला आहे. 10 जानेवारीला रिलीज झालेला या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर यशस्वी 40 दिवस पूर्ण केलेत. घरगुती बॉक्स ऑफिसवर 275 कोटी रूपयांपेक्षा जास्त कमाई या सिनेमानं केली आहे. या सिनेमानंतर रिलीज झालेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर टिकू शकले नाहीत. 

हा सिनेमा अजय देवगणच्या करिअरमधला हायएस्ट वर्ल्डवाइड ग्रोसर सिनेमा ठरला आहे. तान्हाजी सिनेमानं गोलमाल अगेन सिनेमाचाही रेकॉर्ड ब्रेक केला. गोलमाल अगेन (Golmaal Again)ने वर्ल्डवाइड स्तरावर 311 कोटी रूपयांची कमाई केली होती. तान्हाजीनं वर्ल्डवाइड 350 कोटींपेक्षा जास्त रूपयांची कमाई केली आहे. 

तान्हाजी बॉक्स ऑफिसमधून उतरण्याचं नावच घेत नाही आहे. या सिनेमानं हल्लीच   लव आज कल (Love Aaj Kal), मलंग (Malang), छपाक (Chhapaak) आणि पंगा (Panga)या सिनेमांनाही बॉक्स ऑफिसवर टिकू दिलं नाही.  

तान्हाजी सिनेमाची सक्सेस स्टोरी जाणून घेण्यासाठी आम्ही ट्रेड एनालिस्ट रोहित जयस्वाल आणि सुमित कादेल यांच्यासोबत बातचित केली. रोहित जयस्वालनं सांगितलं की, ओम राऊतनं हा सिनेमा खूप सुंदर बनवला आहे. अजय देवगणसहित सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका चोख निभावली आहे. सिनेमाच्या समीक्षकांनीही या सिनेमाचं कौतुक केलं आणि  त्यामुळे माऊथ पब्लिसिटीचा सिनेमाला फायदा झाला. छपाक सिनेमाला झालेल्या विरोधाचा फायदा तान्हाजी सिनेमाला झाला. 

ट्रेंड एनालिस्ट सुमित कादेलनुसार, तान्हाजी सिनेमा खूप चांगला आहे. प्रेषकांनाही ऐतिहासिक सिनेमे बघायला आवडतात. फक्त ते सिनेमे चांगल्या पद्धतीनं बनवणं आवश्यक आहे. सिनेमाचे 3D इफेक्ट खूप चांगलं आहे. हा अनुभव प्रेषकांच्या खूप पसंतीस उतरला. हा सिनेमा महाराष्ट्रीयन योद्धाची कथा आहे आणि महाराष्ट्रमध्ये या सिनेमाला खूप पसंती मिळाली.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. यात तान्हाजी मालुसरेंची भूमिका अभिनेता अजय देवगननं साकारलीय. तर चित्रपटात अभिनेता सैफ अली खान उदयभान राठोड या निगेटिव्ह भूमिकेत दिसतोय. तर अभिनेत्री काजोल चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता शरद केळकरनं साकारलीय. तान्हाजी सिनेमा सैफ अली खान आणि काजोलचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. तान्हाजीनं टोटल धमालचं कलेक्शनला मागं टाकलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी