Srk and kajol together : 7 वर्षांनंतर शाहरुख-काजोल सिल्व्हर स्क्रीनवर एकत्र दिसणार, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

बी टाऊन
Updated May 03, 2022 | 16:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Srk and kajol together : शाहरुख खान आणि काजोल 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार आहेत. या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच वाट पाहत असतात. आता हे दोन्ही कलाकार लवकरच सिल्व्हर स्क्रीनवर एकत्र काम करताना दिसणार असल्याची बातमी आहे.

After 7 years, Shah Rukh and Kajol will be seen together on the silver screen, good news for the fans
शाहरुख-काजोल पुन्हा एकत्र झळकणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 7 वर्षांनंतर शाहरुख खान आणि काजोल सिल्व्हर स्क्रीनवर एकत्र दिसणार
  • करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात काम करणार असल्याची चर्चा
  • सिनेमात कॅमिओ, किंवा डान्स करण्याची शक्यता

Srk and kajol together : शाहरुख खान आणि काजोल 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार आहेत. या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच वाट पाहत होते. अशा परिस्थितीत हे दोन्ही कलाकार लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार असल्याची बातमी आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. बऱ्याच दिवसांनंतर दोघेही पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. आजही त्यांची मोहिनी प्रेक्षकांच्या मनातून उतरलेली नाही. त्यामुळेच शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


करण जोहर दिग्दर्शित चित्रपटात काजोल आणि शाहरुख खान काम करणार आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, दिग्दर्शक करण जोहर त्याच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये शाहरुख खान आणि काजोलला एकत्र आणणार आहे. प्रेक्षक त्याच्या चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. 
या चित्रपटात शाहरुख आणि काजोलच्या छोट्या भूमिका आहेत. हे गाणे तसेच छोटी भूमिकाही असू शकते. या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग लीड रोलमध्ये आहेत.

Kajol: All of Shah Rukh Khan's wishes came true when Aryan came back home |  Hindi Movie News - Times of India
या चित्रपटात जया बच्चन, शबाना आझमी आणि धर्मेंद्र हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा प्रेक्षणीय असणार असल्याचा अंदाज चाहत्यांना आहे. अशा परिस्थितीत काजोल आणि शाहरुख या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोघेही लवकरच चित्रपटातील त्यांच्या भागाचे शूटिंग करणार आहेत. हे शूट मुंबईतच होणार असल्याचं बोललं जात आहे.


आतपर्यंत या जोडीने कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान, दिलवाले, बाजीगर, करण-अर्जुन, असे एकाहून एक हीट सिनेमा या जोडीने दिलेले आहेत. 

आत्तापर्यंत करण जोहर किंवा काजोलने ही माहिती दिलेली नाही. पण ही बातमी खरी ठरली, तर सात वर्षांनी दोन्ही कलाकार पुन्हा एकत्र येणार आहेत. 
हे दोन्ही सेलिब्रिटी एकत्र काम करतील असा अंदाज फार पूर्वीपासून चाहते बांधत आहेत. त्यामुळे शाहरुख आणि काजोलच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच पर्वणी ठरेल यात शंकाच नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी