Big Boss 16 Winner : बिग बॉस 16 नंतर आता एमसी स्टॅन दिसणार 'द कपिल शर्मा शो'मध्ये, व्हायरल झाला व्हिडिओ

बी टाऊन
Updated Feb 28, 2023 | 11:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

एमसी स्टॅनच्या चाहत्यांसाठी अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिग बॉस 16 जिंकल्यानंतर एमसी स्टॅन (MC Stan) आता सोनी टिव्हीचा प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये प्रेक्षकांनाचे मनोरंजन करताना दिसणार आहे. एमसी स्टॅन आणि कपिल शर्माने आपल्या इंस्टाग्राम हॅडेलवर व्हिडीओ षेअर केला आहे, ज्यात स्टॅनने आपला प्रसिद्ध गाण 'बस्ती का हस्ती' गाताना दिसला आहे.

After Bigg Boss 16, MC Stan will now appear in 'The Kapil Sharma Show'
Big Boss 16 Winner : बिग बॉस 16 नंतर आता एमसी स्टॅन दिसणार 'द कपिल शर्मा शो'मध्ये, व्हायरल झाला व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एमसी स्टॅनच्या चाहत्यांसाठी अजून एक मोठी बातमी समोर येत आहे.
  • आता सोनी टिव्हीचा प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये प्रेक्षकांनाचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
  • बिग बॉस 16 मध्ये येण्याआधी एमसी स्टॅन त्याचा रॅपमुळे खूप प्रसिद्ध होता.

MC Stan in The Kapil Sharma Show: एमसी स्टॅनच्या चाहत्यांसाठी अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिग बॉस 16 जिंकल्यानंतर एमसी स्टॅन (MC Stan) आता सोनी टिव्हीचा प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये प्रेक्षकांनाचे मनोरंजन करताना दिसणार आहे. एमसी स्टॅन आणि कपिल शर्माने आपल्या इंस्टाग्राम हॅडेलवर व्हिडीओ षेअर केला आहे, ज्यात स्टॅनने आपला प्रसिद्ध गाण 'बस्ती का हस्ती' गाताना दिसला आहे. एमसी स्टॅनचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे, या व्हिडिओवर टिप्पणी करताना, चाहते द कपिल शर्मा शोमध्ये एमसी स्टॅनला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बिग बॉस 16 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसी स्टॅनची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. एमसी स्टेनचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. एमसी स्टेन आणि कपिल शर्माचा हा व्हिडिओ पाहूया.

अधिक वाचा : Salman Khan : सलमानच्या दबंगगिरीला कंटाळला हा अभिनेता, चक्क 23 वर्ष एकत्र काम करण्यास दिला नकार

कपिल शर्मासह गायले  'बस्ती का हस्ती'

बिग बॉस 16 मध्ये येण्याआधी एमसी स्टॅन त्याचा रॅपमुळे खूप प्रसिद्ध होता. त्याचे अनेक गाणी जसकी 'मैं बस्ती का हस्ती' तरूणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. चाहते त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी स्वतःला जोडतात. बिग बॉस 16ची ट्रॉफी एमसी स्टॅनने आपल्या जबरदस्त चाहत्यांच्या फॉलोइंगमुळे जिंकली आहे. आता द कपिल शर्मा शोमध्ये एमसी स्टॅनला पाहुणे म्हणून पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

सोशल मिडीयावर व्हायरल व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन लाल रंगाच्या कपड्यात पूर्ण रॅपरच्या वाईबमध्ये दिसत आहे. दरम्यान, तो कपिल शर्मासोबत 'बस्ती का हस्ती' हे गाणे गात आहे. कपिल शर्मासोबत शोमध्ये उपस्थित असलेले प्रेक्षकही एमसी स्टेनच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी