Kantara OTT release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा कांतारा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

बी टाऊन
Updated Nov 18, 2022 | 20:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kantara OTT Releasing Date: बॉक्स ऑफिसवर (Box office) धुमाकूळ घातल्यानंतर, कांतारा (Kantara movie) आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार कांतारा हे जाणून घ्या.

After box office release Kantara releasing OTT
'कांतारा' ओटीटीवर रिलीज होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'कांतारा' ओटीटीवर रिलीज होणार
  • 24 नोव्हेंबरला 'कांतारा' रिलीज होण्याची शक्यता
  • हिंदीसह तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये ओटीटीवर रिलीज होणार

Kantara OTT Releasing Date: बॉक्स ऑफिसवर (Box office) धुमाकूळ घातल्यानंतर, कांतारा (Kantara movie) आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार कांतारा हे जाणून घ्या. (After box office release Kantara releasing OTT)

कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या कांतारा या सिनेमाला साऊथसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही भरभरून प्रेम मिळाले. या सिनेमाने हिंदीमध्येही खळबळ उडवून दिली आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 50 दिवस पूर्ण केले आहेत. बॉलिवूडमध्ये 50 दिवस पूर्ण करणारा हा दक्षिणेतील पहिला सिनेमा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच बॉलिवूडचे चाहते असणाऱ्या प्रेक्षकांचेही मन जिंकले आहे. 

अधिक वाचा : कोण साकारणार अटलजींची व्यक्तीरेखा?


कांतारा आता बॉक्स ऑफिसनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार कांतारा हा सिनेमा 24 नोव्हेंबर रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा हिंदीसह तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये ओटीटीवर रिलीज होणार आहे. याआधी कांतारा हा सिनेमा 4 नोव्हेंबरला रिलीज होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, सिनेमाला मिळालेला प्रतिसाद पाहून सिनेमाच्या ओटीटी रिलीजची तारीख बदलण्यात आली. मात्र, याची कोणतीही अधिकृत माहिती निर्मात्यांनी दिलेली नाही. 

अधिक वाचा :  'दृश्यम 2' पायरसी साइटवर लीक


सर्वाधिक कमाई करणारा 7 वा सिनेमा


रिषभ शेट्टीच्या या सिनेमाने पहिल्या दिवशी 1.27 कोटी रुपयांची कमाई करत हिंदीमध्ये संथ सुरुवात केली. त्यानंतर मात्र, सिनेमाच्या कमाईत वाढ झाली. दुसऱ्या वीकेंडपर्यंत कमाईचा आकडा 31 कोटींवर पोहोचला होता. तसेच या सिनेमाने  5 आठवड्यात 75 कोटींचा व्यवसाय केला आहे. कांतारा कन्नड सिनेमा उद्योगातील सर्वाधिक कमाई दुसऱ्या क्रमांकाचा सिनेमा ठरला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या पॅन इंडिया रॉकिंग स्टार यशच्या सिनेमाचा समावेश आहे. त्याच वेळी, कांतारा हा हिंदीत डब केलेला 7वा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. यामध्ये बाहुबली 2, KGF 2, RRR, 2.O, बाहुबली आणि पुष्पा यांच्या नावांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी