धक्कादायक, शर्लिन चोपडानेही केला साजिद खानवर आरोप, 6 वर्षांपूर्वी केली होती ही 'गलिच्छ गोष्ट'

बी टाऊन
Updated Jan 20, 2021 | 13:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sherlyn Chopra accuses Sajid Khan: जिया खानची बहीण करिश्मा आणि मॉडेल डिंपल पॉलानंतर बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोपडानेही दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

Sherlyn Chopra and Sajid Khan
जिया खानच्या बहिणीनंतर शर्लिन चोपडानेही केला साजिद खानवर आरोप, 6 वर्षांपूर्वी केली होती ही गलिच्छ गोष्ट 

थोडं पण कामाचं

  • जिया खानची बहीण करिश्मानेही केले होते साजिद खानवर गंभीर आरोप
  • 2018मध्येही तीन महिलांनी केले होते साजिद खानवर आरोप
  • आता अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही केले साजिदवर आरोप

मुंबई : जिया खानची (Jia Khan) बहीण (sister) करिश्मा (Karishma) हिने साजिद खानवर (Sajid Khan) गंभीर आरोप (serious allegations) केल्यानंतर बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही (Sherlyn Chopra) चकित करणारे खुलासे केले आहेत. जिया खानच्या मृत्यूवर आधारित बीबीसीचा (BBC) माहितीपट (documentary) ‘डेथ इन बॉलिवुड’मध्ये जियाची बहीण करिश्माने म्हटले होते, ‘सरावाच्या वेळी जिया आपली स्क्रिप्ट वाचत होती. तेव्हा साजिदने तिला तिचा टॉप आणि ब्रा उतरवण्यास सांगितले.’ या खुलाशानंतर पुन्हा एकदा साजिद खान आरोपांच्या फेऱ्यात अडकताना दिसत आहे.

ट्वीट करून शर्लिनने केले साजिदवर आरोप

जेव्हा शर्लिन चोपडाने आपले आरोप ट्विटरच्या माध्यमातून केले, तेव्हा चित्रपटसृष्टीत भूकंप झाला आहे. शर्लिन चोपडानेही साजिद खानवर लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. तिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा आरोप केला. तिने यात म्हटले आहे की जेव्हा 6 वर्षांपूर्वी ती साजिदला भेटली होती तेव्हा त्याने तिच्याशी गैरव्यवहार केला होता. त्याने आपले लिंग बाहेर काढले आणि त्याला स्पर्श करण्यास तिला सांगितले होते. तिच्या या आरोपानंतर सर्वजण चकित झाले आहेत.

जियाच्या बहिणीनेही केला होता आरोप

मृत बॉलिवुड अभिनेत्री जिया खानची बहीण करिश्मा हिच्या म्हणण्यानुसार जिया खानसोबतही ती साजिद खानच्या घरी गेली होती. ती स्वयंपाकघरातील टेबलाजवळ बसली होती आणि तिने स्ट्रॅपी टॉप घातला होता. ती खाली वाकून बसलेली होती. त्यावेळी साजिद खान तिला पाहून म्हणाला की तिला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. त्यावेळी तिचे वय फक्त 16 वर्षांचे होते. हे ऐकून जिया खान म्हणाली, की हे आपण काय बोलत आहात? ती निरागस लहान मुलगी आहे.

मॉडेलसह इतर महिलांनीही केले होते आरोप

काही काळापूर्वी मॉडेल पाऊलाने साजिद खानवर आरोप केला होता की जेव्हा ती 17 वर्षांची होती तेव्हा तिला भूमिका देण्यासाठी साजिद खानने आपल्यासमोर कपडे उतरवण्याची अट तिला घातली होती. 2018मध्ये देशात #MeToo आंदोलन चालू होते तेव्हा बॉलिवुडमधील अनेक चेहरे वादात सापडले होते. यावेळीही तीन महिलांनी साजिदवर आरोप केला होता ज्यात एक महिला पत्रकारही होती. यानंतर हाऊसफुल 4 या चित्रपटाच्या निर्मात्यांनी साजिद खानला दिग्दर्शक म्हणून चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.

साजिदचा रेकॉर्ड याबाबतीत वाईट

चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासूनेही म्हटले होते की साजिद खानची सेटवरील महिलांशी वर्तणूक विचित्र होती ज्याचा तिला त्रास होत असे. तो घाणेरडे विनोद करत आहे आणि महिलांप्रति असभ्य होता. तसेच दिया मिर्झानेही म्हटले होते की साजिद महिलांशी घाणेरडी वर्तणूक करत असे आणि त्याची चेष्टाही गलिच्छ असे. अहाना कुमरानेही साजिदवर असेच आरोप केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी