कंगना राणावतनंतर हेमा मालिनी यांनी सोडले मौन, म्हणाल्या...

बी टाऊन
Updated Sep 16, 2020 | 11:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hema Malini on Jaya Bachchan’s statement: जया बच्चन यांच्या भाषणावर आता अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री-राजकारणी असलेल्या हेमा मालिनी याही जया बच्चन यांच्या लोकसभेतील भाषणाशी सहमत आह

Hema Malini, Jaya Bachchan and Kangana Ranaut
हेमा मालिनी, जया बच्चन आणि कंगना राणावत 

थोडं पण कामाचं

  • जया बच्चन यांनी संसदेत चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याच्या प्रयत्नांवर उपस्थित केले होते प्रश्न
  • जया यांच्या विधानामुळे काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत तर बॉलिवुडमधील एक मोठा वर्ग त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहे
  • आता जया बच्चन यांच्या भाषणावर अभिनेत्री हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे

नवी दिल्ली: अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन (actress and politician Jaya Bachchan) यांनी संसदेत चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याच्या होत असलेल्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित केले (raised questions on attempts to malign image of film industry in the parliament) होते. त्यांनी बॉलिवूड जगताला पाठिंबा (Jaya supported Bollywood) देत असे बदनामीचे प्रयत्न थांबवण्याची मागणी केली (demand to stop these attempts of maligning) होती. जया यांच्या विधानामुळे काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत (some people are trolling Jaya for her speech) तर बॉलिवूडमधील एक मोठा वर्ग त्यांच्या समर्थनार्थ पुढे (huge section from Bollywood coming in her support) येत आहे.

आता जया बच्चन यांच्या भाषणावर अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री-राजकारणी हेमा मालिनी याही जया बच्चन यांच्या संसदेतील भाषणाशी सहमत आहेत.

हेमा मालिनी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना बॉलिवूडमध्ये ड्रगचा वापर होत असल्याच्या आरोपांचे उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, 'इथे अनेक उद्योग आहेत आणि हे जगभरात सर्वत्र घडते. आमच्या चित्रपटसृष्टीतही झाले आहे, पण याचा अर्थ असा नाही की संपूर्ण बॉलिवूड वाईट आहे. ज्या प्रकारे लोक बॉलिवूडवर निशाणा साधत आहेत ते वाईट आहे. असे अजिबात होता कामा नये.'

जया बच्चन यांनी केले होते हे वक्तव्य

जया बच्चन यांनी संसदेच्या अधिवेशनात म्हटले होते की, 'बॉलिवूडला बदनाम करण्याचे कारस्थान चालले आहे. मनोरंजन इंडस्ट्री ही दररोज ५ लाख लोकांना थेट रोजगार देते. पण यावर निशाणा साधून मोठ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. सोशल मीडियावरून आम्हाला लक्ष्य केले जात आहे. आम्हाला सरकारकडूनही समर्थन मिळत नाही. ज्या लोकांनी या चित्रपटसृष्टीच्या आधारानेच नाव कमावले, त्यांनीच तिला गटार असे संबोधले. ज्या ताटात जेवतात, त्याच ताटाला लोकांनी छेद पाडू नये. जया यांनी सांगितले की काही लोकांच्या आपसातील मतभेदांचा आणि मनभेदांचा परिणाम इंडस्ट्रीवर होता कामा नये.'

रविकिशन यांच्या या वक्तव्यावर जया बच्चन यांचा पलटवार

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा खासदार रविकिशन यांनी बॉलिवूडमधील ड्रगच्या वापराचा मुद्दा उचलला होता. त्यांनी म्हटले होते की या प्रकरणाचा गांभीर्याने तपास व्हायला हवा जेणेकरून फिल्मजगतावर लागलेला हा डाग साफ होऊ शकेल.

जया बच्चन यांच्या वक्तव्यावर कंगना राणावतने विचारला सवाल

कंगना राणावतने जया बच्चन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत ट्वीट केले होते, 'जया जी, जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेता बच्चन हिला पौगंडावस्थेत मारहाण करण्यात आली असती आणि ड्रग्ज देऊन तिचे शोषण करण्यात आले असते तरीही तुम्ही असेच म्हटले असते का? जर माझ्या जागी अभिषेक बच्चन सातत्याने काही लोकांच्या कारस्थान आणि छळाचा शिकार होत असता आणि एके दिवशी आपल्या घरी लटकलेल्या अवस्थेत सापडला असता तरीही तुम्ही असेच म्हटले असते का? थोडी सहानुभूती आणि पाठिंबा आम्हालाही द्या.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी