Shah Rukh khan : 'लाल सिंग चड्ढा' नंतर आता शाहरुख खानच्या पठाण सिनेमावर बहिष्कार?, #BoycottPathan सोशल मीडियावर ट्रेंडिंग

बी टाऊन
Updated Aug 14, 2022 | 21:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

#BoycottPathan Trend on Twitter : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या ( Shah Rukh Khan )पठाणवर बहिष्कार (Boycott Pathan ) टाकण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला आहे. त्यामुळे शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट रिलीज होण्याआधीच अडचणीत सापडला आहे. अलीकडेच आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षयचा रक्षाबंधन या चित्रपटांवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे.

Shah Rukh Khan Film Boycott Pathan trend on twitter
शाहरुखच्या पठाण सिनेमावरही बहिष्कार?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर पठाण सिनेमावर बहिष्कार घालण्याचा ट्रेंण्ड
  • लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधननंतर आता पठाणची बारी
  • ट्विटरवर #BoycottPathan ट्रेंड करत आहे.

#BoycottPathan Trend on Twitter : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या  ( Shah Rukh Khan ) पठाणवर बहिष्कार (Boycott Pathan ) टाकण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला आहे. त्यामुळे शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट रिलीज होण्याआधीच अडचणीत सापडला आहे. अलीकडेच आमिर खानचा (Aamir khan ) लाल सिंग चड्ढा ( Laal Singh Chaddha ) आणि अक्षयचा ( Akshay Kumar ) रक्षाबंधन ( Rakshabandhan ) या चित्रपटांवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे. ( After laal Singh Chaddha Shah Rukh Khan Film Boycott Pathan trend on twitter )


बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड वाढत आहे. अलीकडेच आमीर खानचा चित्रपट लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा चित्रपट रक्षाबंधनवर बहिष्कार टाकल्यानंतर आता ट्विटरवर शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची चर्चा आहे. ट्विटरवर #BoycottPathan ट्रेंड करत आहे. 

अधिक वाचा : वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा रस आहे फायदेशीर, वाचा सविस्तर

शाहरुखच्या चित्रपटावर बहिष्कार?

सोशल मीडियावर, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या ( Shah Rukh Khan ) पठाणवरही बहिष्कार (Boycott Pathan ) टाकण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत शाहरुख खानचा कमबॅक चित्रपट रिलीज होण्याआधीच अडचणीत सापडला आहे. 


शाहरुख खानच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे, दीपिका पदुकोणने जेएनयूला भेट दिल्याचं कारण असल्याचं यूजर्स सांगत आहेत. 

अधिक वाचा : विलासराव देशमुखांच्या आठवणीने सूनबाईंच्या डोळ्यात पाणी


काय म्हणाले यूजर्स?

एका यूजरने बॉयकॉट पठाणचा हवाला देताना लिहिले - नेक्स्ट मिशन.. Boycott Pathan 


दुसर्‍या यूजरने लिहिले - मिशन स्टार्ट. #Boycott Pathan 


लवकरच येत आहे #BoycottLalSinghChaddha #Boycott_Lal_Singh_Chaddha #Boycott_Lal_Singh_Chaddha 
 #BoycottPathan 
 


कधी रिलीज होणार पठाण?

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा पठाण २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाचे लूक्सही सोशल मीडियावर समोर आले आहेत. शाहरुखचे चाहते त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

अधिक वाचा : 'या' वेबसीरिज पाहून सेलिब्रेट करा तुमचा स्वातंत्र्यदिन

मात्र सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच ट्विटरवर बॉयकॉट पठाणचा ट्रेंड आल्याने निर्मात्यांची चिंता नक्कीच वाढली आहे. लाल सिंग चड्ढाच्या बहिष्कारानंतर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. बॉयकॉटचा परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर स्पष्टपणे दिसून येत आहे. आता शाहरुखच्या चित्रपटाचे काय होणार? तेच पाहायचे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी