After Pushpa Shreyas Talpade Gets Lots Of Dubbing Offers : बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे सध्या 'सिंगल सलमा' या हिंदी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. श्रेयससाठी 2022 हे वर्ष अतिशय धमाकेदार राहिले आहे. त्याने 'पुष्पा' या दाक्षिणात्य सिनेमाच्या हिंदी डबिंगमध्ये मुख्य कलाकार अल्लू अर्जुन याला अर्थात पुष्पाला हिंदीत आवाज दिला. हा आवाज अतिशय लोकप्रिय झाला. अनेकजण त्या आवाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न करू लागले. श्रेयसच्या आवाजाची चर्चा सुरू झाली. हिंदी सिनेमाप्रेमींनी तर श्रेयसच्या आवाजाची तोंडभरून स्तुती केली. यानंतर अल्पावधीतच श्रेयस तळपदेला अनेक सिनेमांच्या हिंदी डबिंगमध्ये महत्त्वाच्या कलाकाराला आवाज देण्यासाठी ऑफर मिळू लागल्या आहेत.
'पुष्पा नाम है मेरा, मैं झुकेगा नहीं...' आणि 'फ्लावर नहीं फायर है मैं' हे दोन संवाद लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या तोंडून ऐकू येऊ लागले. सिनेमाप्रेमींच्या हृदयात श्रेयस तळपदेला मानाचे स्थान मिळाले.
याआधी श्रेयस तळपदे हा प्रामुख्याने हिंदी कॉमेडी सिनेमातील कलाकार म्हणून ओळखला जात होता. त्याच्या सिनेमांचे कौतुक झाले पण या सिनेमांनी कधीही 'पुष्पा' एवढे मोठे यश मिळवले नाही. मात्र 'पुष्पा' सिनेमाच्या हिंदी डबिंगच्या निमित्ताने श्रेयसच्या आवाजाची चर्चा सुरू झाली. ही चर्चा आजही सुरू आहे. अनेकजण अप्रतिम डबिंगसाठी श्रेयसचे कौतुक करत आहेत.
हिंदी डबिंगच्या निमित्ताने 'पुष्पा' सिनेमाशी जोडला जाणे ही बाब माझ्यासाठी अतिशय लकी ठरली आहे. चाहत्यांच्या कौतुकास पात्र झालो आहे. आता अनेक डबिंगच्या अनेक ऑफर येत आहेत. पण मी विचारपूर्वक निवडक ऑफर स्वीकारणार आहे. नाही तर माझ्या आवाजातले नाविन्य संपून जाईल; असे श्रेयसने सांगितले.
श्रेयसचा जन्म 27 जानेवारी 1976 रोजी झाला. तो आता 46 वर्षांचा आहे. 'पुष्पा' सिनेमाच्या निमित्ताने श्रेयसला सिनेसृष्टीतील बदलाची अतिशय जवळून जाणीव झाली आहे. त्याने आधी 2019 मध्ये 'द लायन किंग' या सिनेमासाठी हिंदी डबिंगकरिता आवाज दिला होता. आता तो निवडक सिनेमांचे डबिंग आणि मोजक्या सिनेमांतून अभिनय करून उरलेला वेळ घरच्यांना देण्याची तयारी करत आहे.
लवकरच 'पुष्पा 2' सिनेमा येईल. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्य कलाकारासाठी हिंदीत डब करण्यासाठी श्रेयस इच्छुक आहे. अल्लू अर्जुन हा माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे, असेही श्रेयस म्हणाला.
अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी 'पुष्पा' सिनेमाच्या निमित्ताने दाखवून दिले की प्रयत्न केले तर सिनेसृष्टीत बदल घडवून आणणे आणि ते लोकप्रिय करणे शक्य आहे. फक्त नियोजन, सातत्य, प्रामाणिकपणे केलेली मेहनत आणि स्वतःवर तसेच चाहत्यांवर विश्वास असेल तर आपण बदल घडवून आणू शकता; असे श्रेयस म्हणाला. त्याने मनोरंजनसृष्टीतील त्याचे पुढचे करिअर हे विचारपूर्वक करणार असल्याचे सांगितले.