सुशांत सिंह राजपूतनंतर 'या' निर्मात्याची डिप्रेशनमुळे आत्महत्या, २७व्या मजल्यावरुन उडी मारली

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Jun 24, 2020 | 13:42 IST

Hollywood Filmmaker Steve Bing committed Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर आता सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 

Steve Bing
स्टिव्ह बिंग  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • हॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता स्टीव्ह बिंग याची आत्महत्या  
  • स्टीव्ह बिंग गेले अनेक दिवस नैराश्याशी झटत होता
  • २७व्या मजल्यावरुन उडी मारुन स्टिव्ह संपवलं जीवन   

लॉस एंजेलिस: Hollywood Filmmaker Steve Bing committed Suicide: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh Rajput) आत्महत्येनंतर सिनेसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. नैराश्यामुळे, सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने २७व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्‍याच दिवसांपासून नैराश्याशी लढत असणारा हॉलिवूडचा (Hollywood) सुप्रसिद्ध निर्माता स्टीव्ह बिंग याने आत्महत्या केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यातच आता स्टीव्हच्या आत्महत्येने हॉलिवूडला देखील आता झटका बसला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, हॉलीवूडमधील दिग्गज सिनेनिर्माता स्टीव्ह बिंग  (वय ५५ वर्ष) हा लॉस एंजेलिसमधील अलिशान अपार्टमेंटमध्ये राहत होता. येथे २७व्या मजल्यावर त्याचे घर होते. गेट कार्टर, एव्हरी ब्रीथसारखे अनेक लोकप्रिय चित्रपट बनवणाऱ्या स्टीव्हने याच अपार्टमेंटमधून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, असेही म्हटले जात आहे की, कोरोना व्हायरसमुळे तो काही दिवसांपासून सेल्फ आयसोलेशनमध्ये होता.

यशस्वी सिनेनिर्माता स्टीव्ह यांचे कुटुंब बरेच संपन्न आहे. त्याचा  ६०० मिलियन डॉलर्स एवढी संपत्ती त्याला वडिलांकडून मिळाली होती. स्टीव्ह दोन मुलांचा बाप होता आणि अभिनेत्री एलिझाबेथ हर्लीसोबत तो रिलेशनशीपमध्ये होता. त्यांच्या या अफेअरबाबत हॉलिवूडमध्ये बरीच चर्चा व्हायची. मात्र, हे अफेअर फार काळ चाललं नाही. दरम्यान, स्टीव्हच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा देत एलिझाबेथ हिने ट्विटरवर त्याला श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

सुशांत सिंहने 14 जून रोजी केली होती आत्महत्या 

बॉलिवूडमध्ये सध्या सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. एक आनंदी आणि चांगल्या अभिनेत्याने   नैराश्यामुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. १४ जून रोजी त्याने या जगाचा निरोप घेतला. दरम्यान, त्याच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध पोलिस घेत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी सुमारे २० जणांचा जबाब नोंदवला आहे.

सुशांत सिंह राजपूतने याने काही महिन्यांपूर्वीच संपूर्ण जगाशी संबंध तोडला होता. तो अनेक दिवस आपल्या घरातच होता. अखेर १४ जूनला आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी