Sushant Singh Rajput: एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर अशी झाली वडील  KK Singh यांची अवस्था 

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Jun 25, 2020 | 10:01 IST

KK Singh Father Of Sushant Singh Rajput Emotional Picture: सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीतच आता वडील केके सिंह हे आपलं आयुष्य घालवत आहेत. एकुलता एक मुलगा गमावल्याच्या दु:खाने सुशांतचे वडील ढासळून गेले आहेत.

sushant singh rajput father kk singh
सुशांत सिंह राजपूत याचे वडील केके सिंह  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे वडील केके सिंह यांना बसला मोठा धक्का 
  • एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर वडील केके सिंह पूर्णपणे ढासळले
  • १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी केली होती आत्महत्या 

पटना: गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाहीत, राहतात त्या  फक्त त्याच्या आठवणी... याच आठवणींवर सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह (Sushant Singh Rajput Father KK Singh) हे आता आपलं आयुष्य जगत आहेत. आपला एकुलता एक मुलगा गमावल्याने केके सिंह हे पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा एका फोटो नुकताच व्हायरल होत आहे. यात केके सिंह आपला मुलगा सुशांतच्या फोटो समोर हतबल झालेल्या अवस्थेत बसलेले दिसत आहे. तरुण मुलाला गमावल्याने केके सिंह हे उन्मळून पडले आहेत. 

सुशांत सिंह राजपूत यांच्या वडिलांची ही अवस्था पाहून सोशल मीडियावरील यूजर्सही बरेच भावूक झाले आहेत. यूजर्स सतत कमेंट करुन या कठीण काळात सुशांतच्या कुटुंबीयांबाबत संवेदना व्यक्त करत आहेत. एका यूजरने आपल्या कमेंटमध्ये असं लिहलं आहे की, 'खरी वेदना सध्या फक्त सुशांतच्या वडिलांनाच जाणवत आहे. या कठीण परिस्थितीत देव त्यांना धैर्य देवो.' दुसर्‍या यूजरने म्हटलं आहे की, 'मुलगा गमावल्याची वेदना फक्त एक वडीलच समजू शकतात. देव तुम्हाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. काका तुमच्या मुलाला नक्की न्याय मिळेल, जनता सुशांतसोबत आहे.' अशा बर्‍याच कमेंट्ससह यूजर्स सुशांतच्या वडिलांची व्यथा वाटून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सुशांतच्या मृत्यूची बातमी त्याचे वडील केके सिंह यांना पोलिसांकडून फोनवरून मिळाली. ही बातमी ऐकताच ते बेशुद्ध झाले. तेव्हापासूनच केके सिंह यांची तब्येत बिघडली आहे. दरम्यान, मुंबईत मुलगा सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्कारासाठी ते कुटुंबासमवेत पोचले होते. पण प्रकृती  बिघडल्यामुळे ते तात्काळ पटनाला परतले होते.

सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूचे हे कारण आहे

१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये गळफास लावून आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide) केली होती. पोस्टमॉर्टम अहवालात असे म्हटले गेले आहे की, मृत्यूचे कारण Asphyxia म्हणजेच शरीरात पुरेसा ऑक्सिजन न मिळणं असं सांगण्यात आलं आहे. मुंबईतील जुहू येथील कूपर रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन झाले आणि त्याचे इतर अवयव हे जे.जे. रुग्णालये पाठविण्यात आले होते. दरम्यान कालच (२५ जून) सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी करण्यात आलेल्या शवविच्छेदनाचा अंतिम रिपोर्ट आला आहे. ज्यामध्ये सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळेच झाल्याचे समोर आले आहे. ५ डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन अहवालाचे विश्लेषण केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी