The Kashmir Files: 'द काश्मीर फाईल्स' नंतर आता 'द दिल्ली फाईल्स', विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा 

बी टाऊन
Updated Apr 15, 2022 | 14:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

The Delhi Files Movie | बॉलिवूड मधील दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी शुक्रवारी १५ एप्रिल २०२२ रोजी एक मोठी घोषणा केली आहे. 'द कश्मीर फाईल्स'च्या भरघोस यशानंतर दिग्दर्शकांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे लवकरच ते त्यांच्या 'द दिल्ली फाईल्स' या नवीन चित्रपटाचे काम सुरू करणार आहे.

After The Kashmir Files, now The Delhi Files, Vivek Agnihotri's big announcement
'द काश्मीर फाईल्स' नंतर आता 'द दिल्ली फाईल्स'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'द काश्मीर फाईल्स' नंतर 'द दिल्ली फाईल्स'ची घोषणा.
  • विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत दिली माहिती.
  • स्टोरी कशावर असणार याकडे सर्वांचे लक्ष.

The Delhi Files Movie | मुबंई : बॉलिवूड मधील दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी शुक्रवारी १५ एप्रिल २०२२ रोजी एक मोठी घोषणा केली आहे. 'द कश्मीर फाईल्स'च्या (The Kashmir Files) भरघोस यशानंतर दिग्दर्शकांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे लवकरच ते त्यांच्या 'द दिल्ली फाईल्स' (The Delhi Files Movie) या नवीन चित्रपटाचे काम सुरू करणार आहे. १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची स्टोरी दाखवून ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या विवेक अग्निहोत्रीनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, दिल्ली फाईल्स या नवीन चित्रपटावर काम सुरू करण्याची संधी आली आहे. (After The Kashmir Files, now The Delhi Files, Vivek Agnihotri's big announcement). 

अधिक वाचा : सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार - राऊत

विवेक अग्निहोत्री यांनी शुक्रवारी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, "त्या सर्वांचे धन्यवाद, ज्यांनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला आपले मानले. गेली ४ वर्षे आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे मेहनत घेतली. मी तुमचा TL स्पॅम केला असेल, पण काश्मिरी हिंदूंवर झालेल्या नरसंहाराची आणि अन्यायाची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आता माझ्या नवीन चित्रपटावर काम सुरू करण्याची वेळ आली आहे." 

'द काश्मीर फाईल्स'ने रचला २५० कोटींचा इतिहास 

मागील महिन्यात ११ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. अवघ्या २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक रूपयांची कमाई केली आहे. एवढेच नाही तर या चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अमानुष अत्याचार पाहून चित्रपटगृहात घोषणाबाजी होत असतानाच राजकीय वातावरणातही खळबळ उडाली होती. या चित्रपटाच्या क्रेझने १९७५ मध्ये रिलीज झालेल्या 'जय संतोषी मां' आणि १९९४ मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटांची प्रेक्षकांना आठवण झाली. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्यासोबतच चित्रपटातील कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांचेही खूप कौतुक झाले आहे. आता दिग्दर्शकाने आणखी एका वादग्रस्त मुद्द्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा करून चर्चेला आमंत्रण दिले आहे. कारण हा चित्रपट देखील एका ऐतिहासिक घटनेचाच भाग असणार आहे. 

अधिक वाचा : ब्रेकिंग ! गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

काय असणार 'द दिल्ली फाईल्स'ची स्टोरी

विवेक अग्निहोत्रींच्या या नव्या चित्रपटाबद्दल आधीच शक्यता वर्तवली जात होती. त्यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचेही वर्णन समाजात फूट पाडणारे आणि धर्मनिरपेक्ष समाजात द्वेष पसरवणारे असे होते असे बहुतांश लोकांनी म्हटले होते. नाना पाटेकरांपासून प्रकाश राजपर्यंत अनेक दिग्गजांनी चित्रपटावर टीका केली होती. दरम्यान, विवेक अग्निहोत्रींच्या 'द दिल्ली फाईल्स' या नव्या चित्रपटाची घोषणा होताच, ते यात काय दाखवणार याविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित काहीतरी दाखवले जाईल असा अंदाज काही जाणकारांना आहे. तर बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की ही कथा २०२० च्या दिल्ली दंगलीची असेल.

दिल्ली दंगलीतील क्रूरता दाखवणार? 

२०२० ची दिल्ली दंगल २३ फेब्रुवारी २०२० पासून सुरू झाली होती. या दंगलींमध्ये दोन समुदायांमध्ये हिंसक हाणामारी झाली होती. यामध्ये एकूण ५३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील काहींना धारदार शस्त्राने गोळ्या घालून ठार करण्यात आले. दंगलीतील मृतांमध्ये एक पोलीस कर्मचारी, गुप्तचर अधिकारी यांचाही समावेश आहे. हिंसाचार संपून आठवडा उलटूनही शेकडो जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मग देशाच्या राजधानीत उघड्या नाल्यांमध्ये मृतदेह सापडत असल्याची वेदना आणि ओरड अशी अवस्था झाली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी