Bhool Bhulaiyaa 2 On OTT: थिएटरनंतर आता'भूल भुलैया 2' ओटीटीवर धमाका करणार, जाणून घ्या कुठे पाहता येणार सिनेमा

बी टाऊन
Updated Jun 16, 2022 | 11:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bhool Bhulaiyaa 2 On OTT : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीची प्रमुख भूमिका असेलाल भूल भुलैया 2 आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता सिनेमा ओटीटी रिलीजसाठी तयार आहे. आतापर्यंत जगभरात सिनेमाने 175 कोटींची कमाई केली आहे. आता ओटीटीवर हा सिनेमा आपली जादू दाखवेल असं सिनेमाच्या निर्मात्यांना आणि कलाकारांना वाटत आहे. जाणून घेऊया कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होत आहे.

 'Bhool Bhulaiya 2' will be on OTT, find out where to watch movies
भूल भुलैया 2 लवकरच ओटीटीवर झळकणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भूल भुलैया 2 ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे
  • नेटफ्लिक्सवर झळकणार भूल भुलैया 2 सिनेमा
  • सिनेमाची जगभरात 175 कोटींची कमाई

Bhool Bhulaiyaa 2 On OTT: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'भूल भुलैया 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 20 मे रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाची जादू आजही चाहत्यांवर आहे, त्यामुळे अजूनही थिएटरमध्ये  चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी होत नाहीये. या चित्रपटातील कार्तिक आर्यनचे काम चाहत्यांना खूप आवडले, तर कियारा अडवाणीसोबतची त्याची जोडी सर्वांच्या मनाला भिडली. आता या चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट आता थिएटरनंतर ओटीटीवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'भूल भुलैया 2' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येतोय हे जाणून घेऊया. 

Bhool Bhulaiyaa 2 Movie Review: From Kartik Aaryan and Kiara Advani's labyrinth, Tabu emerges victorious


या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार सिनेमा


कार्तिक आर्यनचा हा शानदार चित्रपट 'भूल भुलैया 2' लवकरच नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. खुद्द नेटफ्लिक्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सने इंस्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, जो 'दे ताली' गाण्याचा आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'आम्ही दे ताली,दे ताली,दे ताली हे गाणे गात आहोत कारण 'भूल भुलैया 2' लवकरच येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

Bhool Bhulaiyaa 2 Movie Review: From Kartik Aaryan and Kiara Advani's labyrinth, Tabu emerges victorious
ओटीटीवर सिनेमा कधी येणार?

नेटफ्लिक्सने आपल्या पोस्टवरून स्पष्ट केले आहे की 'भूल भुलैया 2' लवकरच OTT वर येणार आहे. पण कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा हा शानदार चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणत्या दिवशी येणार आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाल्यामुळे चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे.

kiara advani: 'Bhool Bhulaiyaa 2' box office collection: Kartik Aaryan-Kiara Advani starrer earns a total of Rs 83 crore | Hindi Movie News - Times of India


या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले आहे.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटात तब्बू आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या २५ दिवसांपासून 'भूल भुलैया 2' प्रेक्षकांचं उत्तम मनोरजंन करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात जवळपास 175 कोटींची कमाई केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी