Allu Arjun New Movie | नवी दिल्ली : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा (South actor Allu Arjun) ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सर्वत्र सोशल मीडियावर (Social Media) अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटावर तरूण वर्ग अक्षरश: ठेका धरताना पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट केवळ दक्षिणेतीलच नाही तर हिंदी भाषिक भागातील प्रेक्षकांनाही भुरळ घालत आहे. याच कारणामुळे या चित्रपटाने रिलीज होताच अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. अल्लू अर्जुनने या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुन हा ॲक्शन, ड्रामा, डान्स आणि कॉमेडीने भरलेला टॅलेंटचा नवीन चेहरा झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चित्रपटातील आपल्या दमदार संवाद, उत्कृष्ट अभिनय आणि डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांना वेड लावणारा अल्लू अर्जुन सध्या देशात खूप चर्चेत आला आहे. (After the unprecedented success of 'Pushpa' Allu Arjun's fortunes shone got100 crore offer for Attlee's film).
दरम्यान, पुष्पा चित्रपटाच्या अभूतपुर्व यशानंतर आता अल्लू अर्जूनचे नशीब आणखी चमकताना दिसत आहे. या चित्रपटाच्या यशामुळे दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनची इंडस्ट्रीत डिमांड वाढली आहे. अशा परिस्थितीत पुष्पा नंतर आता अल्लू अर्जुनकडे अनेक मोठ्या चित्रपटांची ऑफर येत आहे. एवढेच नाही तर या चित्रपटांसाठी त्याला भरघोस मानधनाची ऑफरही दिली जात आहे.
लक्षणीय बाब म्हणजे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना या कलाकारांच्या चित्रपट पुष्पाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करून मागील अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. त्यामुळे आता चित्रपटाच्या या यशाने चित्रपटातील कलाकारांचे नशीबही चमकले आहे. चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयामुळे अल्लू अर्जुन आज केवळ टॉलिवूडमध्येच नाही तर देशभर लोकप्रिय झाला आहे.
या चित्रपटाच्या यशामुळे अल्लू अर्जुन आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार बनला आहे. या अभिनेत्याच्या पुष्पा - द राइज या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून ३०० कोटींच्या घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता अल्लू अर्जुनलाही याहूनही अधिक रकमेचे अनेक चित्रपट ऑफर केले जात आहेत.
माध्यमांच्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन आता ॲटलीसोबत मिळून काम करणार आहे. वास्तविक लायका प्रॉडक्शनने त्यांच्या चित्रपटासाठी अर्जूनशी संपर्क साधला आहे. या प्रकल्पासाठी अल्लू अर्जुनला १०० कोटी रुपयांचे मानधनही देणार असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. त्याच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे ॲटली थेरी, मार्सल आणि बिगिल यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जातात. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुन ॲटलीची जोडी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.