Pathan OTT release : शाहरुख खानच्या पठाणच्या या ओटीटी प्लॅटफॉर्मशी करार, डीलची किंमत ऐकून थक्क व्हाल

बी टाऊन
Updated May 02, 2022 | 14:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pathan OTT release :बऱ्याच दिवसांपासून चाहते शाहरुख खान पडद्यावर दिसण्याची वाट पाहत आहेत. शाहरुखही त्याच्या पठाण या चित्रपटातून सिल्व्हर स्क्रीनवर पुनरागमन करत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात तसेच ओटीटीवर रिलीज होणार आहे, ज्याचा करार निश्चित झाला आहे.

Agreement with Shah Rukh Khan's Pathan OTT platform,
शाहरुखचा पठाण थिएटरबरोबरच अँमेझॉन प्राइमवरही दिसणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बऱ्याच दिवसांपासून शाहरुख पडद्यावर दिसला नाही आणि आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे.
  • तो लवकरच 'पठाण' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून इतर प्रोजेक्टमध्ये अडकणार आहे.
  • शाहरुख खान दोन वर्षांपासून कोणत्याही प्रोजेक्टचा भाग नाही.

Pathan OTT release : बऱ्याच दिवसांपासून चाहते शाहरुख खान पडद्यावर दिसण्याची वाट पाहत आहेत. शाहरुखही त्याच्या पठाण या चित्रपटातून पडद्यावर पुनरागमन करत आहे. आता बातमी अशी आहे की त्याचा चित्रपट चित्रपटगृहात तसेच ओटीटीवर रिलीज होणार आहे, ज्याचा करार निश्चित झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही डील करोडोंमध्ये फायनल झाली आहे, जी ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

कोरोनाच्या काळात झपाट्याने आपले स्थान निर्माण केलेले OTT आता मनोरंजनाचे प्रमुख माध्यम बनले आहे हे तुम्हाला माहीत आहे. पूर्वी जिथे पाच ते सहा ओटीटी प्लॅटफॉर्म होते तिथे आता डझनभर नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म आले आहेत. लोकांना घरी बसून त्यांच्या फोनवर चित्रपट आणि वेबसीरिज बघायला आवडतात. सर्व दिग्गज स्टार्स ओटीटीकडे वळले आहेत, पण शाहरुख अजूनही यापासून दूर आहे.


पठाणच्या ओटीटी डीलमुळे शाहरुखचेही नाव ओटीटीवर आलेल्या स्टार्सच्या यादीत सामील होणार आहे. शाहरुखच्या आधी अजय देवगण, अक्षय कुमार आदी स्टार्सचे सिनेमे ओटीटीवर आले आहेत. अॅमेझॉन प्राइमसोबत ही डील 200 कोटींहून अधिक रुपयांची झाली आहे. निर्माते किंवा शाहरुख खानकडूनही अधिकृत पुष्टी नाही.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख रॉ एजंट फिरोज पठाणच्या भूमिकेत असेल तर दीपिकाही त्याच्यासोबत रॉ एजंटच्या भूमिकेत असेल. जॉन अब्राहमची भूमिकाही महत्त्वाची आहे कारण तो एका दहशतवाद्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात आशुतोष राणा, डिंपल कपाडिया आणि गौतम रोडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.


शाहरुख खान गेल्या वेळी दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या झिरो या चित्रपटात दिसला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवली नाही. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा दिसल्या होत्या. आता शाहरुख धमाकेदार पुनरागमनाच्या तयारीत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी