धक्कादायक : 24 वर्षांच्या अभिनेत्रीचा Heart Attack ने मृत्यू

Aindrila Sharma passes away at 24 due to cardiac arrest : मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे 24 वर्षांच्या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे.

Aindrila Sharma passes away at 24 due to cardiac arrest
धक्कादायक : 24 वर्षांच्या अभिनेत्रीचा Heart Attack ने मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • धक्कादायक : 24 वर्षांच्या अभिनेत्रीचा Heart Attack ने मृत्यू
  • घटना आज म्हणजेच रविवार 20 नोव्हेंबर 2022 रोजी घडली
  • बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्मा (24) हिचे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे निधन

Aindrila Sharma passes away at 24 due to cardiac arrest : मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे 24 वर्षांच्या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज म्हणजेच रविवार 20 नोव्हेंबर 2022 रोजी घडली. 

बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्मा (24) हिचे हृदयविकाराचा झटका आल्यामुळे निधन झाले. अँड्रिला शर्माला शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना हॉस्पिटलमध्येच अँड्रिला शर्माचा मध्यरात्री 12.59 वाजता मृत्यू झाला. 

Kantara OTT release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा कांतारा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

Drishyam 2 Leak: अजय देवगणचा 'दृश्यम 2'पायरसी साइटवर लीक, निर्मात्यांना मोठा धक्का

Siddhaanth Surryavanshi : टीव्ही जगताला आणखी एक धक्का, जिममध्ये वर्कआउट करताना 'कसौटी जिंदगी की' च्या अभिनेत्याचा मृत्यू

अँड्रिलाला हावडा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मेडिकल टीम अँड्रिलाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत होती. पण तब्येत खालावली आणि अँड्रिलाने आज म्हणजेच रविवार 20 नोव्हेंबर 2022 रोजी मध्यरात्री 12.59 वाजता अखेरचा श्वास घेतला. 

अँड्रिलाला तिच्या 24 वर्षांच्या आयुष्यात 2 वेळा कॅन्सर झाला होता. कॅन्सरमुक्त झालेल्या अँड्रिलाला 1 नोव्हेंबर 2022 रोजी ब्रेन स्ट्रोक आला. या स्ट्रोकमधून सावरत असलेल्या अँड्रिलाला हृदयविकाराचा झटका आला. 

Aindrila Sharma passes away

बंगाली प्रेक्षकांसाठी अँड्रिला हा एक लोकप्रिय चेहरा होती. 'झुमुर' या टीव्ही शोच्या माध्यमातून अँड्रिलाने बंगाली मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले होते. 'भागर' या ओटीटी शो मध्येही अँड्रिलाने काम केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी