अजय देवगणचं सांत्वन करायला पोहोचले बॉलिवूडचे हे टॉप सेलेब्स 

बी टाऊन
Updated May 27, 2019 | 18:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ajay devgan father veeru devgan died: अजय देवगणच्या या सर्वांत वाईट परिस्थितीत शाहरूख खान सर्वांत पहिले त्यांच्या घरी पोहोचला. शाहरूख व्यतिरिक्त सनी देओल देखील अजयचं सांत्वन करायला गेला. 

ajay devgan and celebrity
अजय देवगणचं सांत्वन करायला पोहोचले बॉलिवूडचे हे टॉप सेलेब्स  

मुंबईः अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वीरू देवगण खासकरून एक्शन डायरेक्टर म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होते. त्यांनी आपला मुलगा अजय देवगणच्या बऱ्याच सिनेमांमध्ये स्टंट सीन डायरेक्ट केले होते. वडिलांच्या निधनानं देवगण कुटुंबीय खूप दुःखात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वीरू देवगण आजारी होते. अजयनं त्यांच्यासाठी आताच रिलीज झालेला दे दे प्या दे या सिनेमाच्या प्रमोशनवेळी अनेक मुलाखती सुद्धा रद्द केल्या. अजय देवगणच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच बॉलिवूड सेलेब्स त्याच्या घरी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले आहेत. 

अजय देवगणला या दुःखद घटनेवेळी सावरण्यासाठी शाहरूख खान सर्वांत पहिला त्याच्या घरी पोहोचला. शाहरूख खान व्यतिरिक्त सनी देओल पोहोचला होता. सनी देओलचा भाऊ बॉबी देओल काजोलसोबत वीरू देवगण यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले. बॉबी, सनी आणि काजोल हे खूप जवळचे मित्र आहेत. अजय देवगण आणि काजोलला भेटण्यासाठी संजय दत्त सुद्धा त्यांच्या घरी पोहोचला आहे. 

ट्विंकल खन्ना, महेश भट्ट, अयान मुखर्जी, साजिद खान, हरमन बाजवा, हॅरी बाजवासह अनेक बॉलिवूडचे सेलेब्स अजय देवगणच्या घरी पोहोचले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#sunnydeol #BobbyDeol snapped at#ajaydevgn house today #rip #veerudevgan #instadaily #manavmanglani @manav.manglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#twinklekhanna baby Nitara and #akshaykumar today at the private airport #airportdiaries @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#maheshbhatt Arrives to pay last respect to #veerudevgan who has passed away today morning. #rip @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

वीरू देवगण जेव्हा अखेरचा श्वास घेत होते. तेव्हा अजय देवगण त्यांच्यासोबत नव्हता. तेव्हा अजय देवगण आपला अपकमिंग सिनेमा तानाजीची शूटिंग करत होता. शेवटच्या क्षणी काजोलनं एकटीनं सासऱ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 

वीरू देवगण हे अॅक्शन डायरेक्टरसोबतच फिल्म डायरेक्टर सुद्धा होते. त्यांनी १९९९ मध्ये आलेला हिंदूस्तान की कसम हा सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमात वीरू यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा एक्टर अजय देवगण आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन,  मनीषा कोइराला, सुष्मिता सेन दिसले होते. याव्यतिरिक्त त्यांनी लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीकत यांसारखे मोठ्या सिनेमांमध्ये अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#ayanmukerji Arrives to pay last respect to #veerudevgan who has passed away today morning. #rip @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#ajaydevgan #dilwale film director #harrybaweja arrives with son #harmanbaweja to pay last respect to #veerudevgan

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सौरभ आणि सिंहासन या सिनेमांमध्ये देखील त्यांनी काम केलं. दिल क्या करे या सिनेमाच्या निर्मितीचं काम सुद्धा वीरू यांनी केलं. इन्कार, मि. नटवरलाल, शेहनशाह, हिंमतवाला, त्रिदेव, बाप नंबरी बेटा दस नंबरी, फुल और काँटे अशा अनेक सिनेमात अॅक्शन सीन्सवर काम केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अजय देवगणचं सांत्वन करायला पोहोचले बॉलिवूडचे हे टॉप सेलेब्स  Description: Ajay devgan father veeru devgan died: अजय देवगणच्या या सर्वांत वाईट परिस्थितीत शाहरूख खान सर्वांत पहिले त्यांच्या घरी पोहोचला. शाहरूख व्यतिरिक्त सनी देओल देखील अजयचं सांत्वन करायला गेला. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles