'Drishyam 2' Advance Booking Report: 'रनवे 34'आणि 'थँक गॉड'च्या अपयशानंतर आता 'दृष्यम 2'कडून अपेक्षा, आतापर्यंत 'इतकं' झालं Advance Booking

बी टाऊन
Updated Nov 17, 2022 | 15:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

'Drishyam 2' Advance Booking Report:'रनवे 34' आणि 'थँक गॉड' फ्लॉप झाल्यानंतर अजय देवगण (Ajay Devgn) सध्या 'दृश्यम 2' (Drishyam 2) च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतीच या सिनेमाबद्दल एक चांगली माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 'दृश्यम 2'ची 70 हजारांहून अधिक तिकीटे विकली गेली आहेत. सिनेमाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग चांगले होत असल्याचं यावरून म्हणता येईल.

Ajay Devgan starrer 'Drishyam 2' Advance Booking Report
... आता अपेक्षा 'दृष्यम 2'कडून  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'दृश्यम 2'च्या Advance Booking ला चांगला प्रतिसाद
  • आतापर्यंत 70 हजरांहून अधिक बुकींग झाले आहे
  • अजय देवगणला 'दृश्यम 2' कडून भरपूर अपेक्षा

'Drishyam 2' Advance Booking Report: 'रनवे 34' आणि 'थँक गॉड' फ्लॉप झाल्यानंतर अजय देवगण (Ajay Devgn) सध्या 'दृश्यम 2' (Drishyam 2) च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतीच या सिनेमाबद्दल एक चांगली माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 'दृश्यम 2'ची 70 हजारांहून अधिक तिकीटे विकली गेली आहेत. सिनेमाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग चांगले होत असल्याचं यावरून म्हणता येईल. (Ajay Devgan starrer 'Drishyam 2' Advance Booking Report)

अधिक वाचा : पोलिसच निघाले अमली पदार्थ तस्कर

 बॉक्स ऑफिसवर (Box office) असलेली बॉलिवूड सिनेमांची पकड, त्याचा दबदबा हळूहळू कमी होत आहे. प्रेक्षक स्वतःला या सिनेमांशी कनेक्ट करू शकत नाहीत. गेल्या काही महिन्यांत आमीर खान (Aamir khan) आणि अक्षय कुमार (Akshay kumar) यांसारख्या अनेक बड्या स्टार्सचे बिग बजेट सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. अभिनेता अजय देवगणच्या बाबतीतही काहीसं असंच पाहायला मिळत आहे. अजय देवगणाचा (Ajay Devgn) 'रनवे 34' आणि 'थँक गॉड' हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकले नाहीत. या सिनेमांकडून अजय देवगणाला खूप अपेक्षा होत्या मात्र, त्याचा अपेक्षाभंग झाला. या दोन्ही सिनेमांनी फारच वाईट कामगिरी केली. त्यामुळे आता अजय देवगण 'दृश्यम 2' (Drishyam 2) या आगामी सिनेमाच्या रिलीजची वाट पाहत आहे. हा सिनेमा 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आतापर्यंत 'दृश्यम 2'ची 70 हजारांहून अधिक तिकीटे विकली गेली आहेत. त्यामुळे सिनेमा पहिल्या वीकेण्डमध्ये चांगली कमाई करण्यात यशस्वी होईल असं म्हणायला हरकत नाही. 


या शुक्रवारी अजय देवगणचा बहुप्रतीक्षित 'दृश्यम 2' थिएटरमध्ये रिलीज  होणार आहे. 'दृश्यम 2' च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या अहवालानुसार, पहिल्या वीकेंडला सिनेमा चांगली कमाई करण्याची अपेक्षा आहे. 'PVR', 'INOX' आणि 'Cinepolis' यांनी अजय देवगण स्टारर  'दृश्यम 2' या सिनेमाच्या सुरुवातीच्या वीकेंडसाठी 77,000 पेक्षा जास्त तिकिटे विकली आहेत. हे बुकिंग बुधवारपर्यंतच झाल्याची माहितीही समोर आली आहे. गुरुवारी विकल्या जाणाऱ्या तिकिटांच्या संख्येत वाढ होऊ शकते. सिनेमाचा हा वेग पाहता येणाऱ्या काळात सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी आशा आहे. 

अधिक वाचा : लग्न पत्रिकेचा मायना, चारोळी अन् आमंत्रण पत्रिका मराठीत

अभिषेक पाठक दिग्दर्शित 'दृश्यम 2' हा 2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम'चा सिक्वेल आहे. या सिनेमात अजय देवगण व्यतिरिक्त अक्षय खन्ना, इशिता दत्ता, मृणाल जाधव, निशिकांत कामत, श्रिया सरन आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला होता. ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र, आता सिनेमाला कसा काय प्रतिसाद देतात ते सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी