Drishyam 2 Leak: अजय देवगणचा 'दृश्यम 2'पायरसी साइटवर लीक, निर्मात्यांना मोठा धक्का

बी टाऊन
Updated Nov 18, 2022 | 16:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Drishyam 2 Leak: अजय देवगणचा 'दृश्यम 2'( Drishyam 2 ) हा सिनेमा पायरसी साइट्सवर लीक झाला आहे. अनेक ऑनलाइन पायरसी साइट्सवर सिनेमा लीक झाल्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यतावर्तवण्यात येत आहे. सिनेमाचं अ‍ॅडव्हान्स बुकींग चांगलं झालेलं आहे. मात्र, सिनेमा लीक झाल्याचा फटका बसू शकतो.

Ajay Devgan starrer Drishyam 2 Leak on piracy sites
'दृश्यम 2' पायरसी साइटवर लीक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अजय देवगणचा 'दृश्यम 2' पायरसी साइट्सवर लीक
  • सिनेमा लीक झाल्याने निर्मात्यांना फटका बसण्याची शक्यता
  • पायरसी साइट्समुळे निर्मात्यांचं नुकसान

Drishyam 2 Leak: अजय देवगण ( Ajay Devgan) चा 'दृश्यम 2'( Drishyam 2 ) हा सिनेमा पायरसी साइट्सवर लीक झाला आहे. अनेक ऑनलाइन पायरसी साइट्सवर सिनेमा लीक झाल्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यतावर्तवण्यात येत आहे. सिनेमाचं अ‍ॅडव्हान्स बुकींग चांगलं झालेलं आहे. मात्र, सिनेमा लीक झाल्याचा फटका बसू शकतो. 


अजय देवगणच्या ( Ajay Devgan) 'दृश्यम 2' सिनेमाच्या निर्मात्यांसाठी एक वाईट बातमी आहे. थिएटरमध्ये रिलीज झालेला हा सिनेमा पायरसी मूव्ही साइट्सवर लगेच लीक झाला आहे. तमिलरॉकर्स  (Tamilrockers) आणि फिल्मझिला (Filmyzilla) नावाच्या वेबसाइटवर हा सिनेमा लीक झाला आहे. त्यामुळे निर्मांत्याना मोठा धक्का बसला आहे. सिनेमा लीक करण्याच्याबाबतीत या पायरसी साइट्स पहिल्या क्रमांकावर आहेत. मात्र, 'दृश्यम 2' ( Drishyam 2 ) ला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. सिनेमाला मिळणार  प्रतिसाद पाहून निर्माते खूश आहेत. मात्र, सिनेमा लीक झाल्याने आता यापुढे सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, आता प्रेक्षक थिएटरमध्ये जाण्याऐवजी घरी बसून सिनेमा पाहतील. त्यामुळे थिएटरमधील प्रेक्षकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. 'दृश्यम 2'मध्ये अजय देवगण व्यतिरिक्त श्रिया सरन, तब्बू (Tabu) आणि अक्षय खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)


पायरसी साइट्समुळे निर्मात्यांचं नुकसान होत आहे


तमिलरॉकर्स  (Tamilrockers) आणि फिल्मझिला  (Filmyzilla) सारख्या पायरसी साइट्स बॉलिवूड आणि  निर्मात्यांची डोकेदुखी ठरत आहेत. या साइट्स त्यांच्या वेबसाइटवर सिनेमा रिलीज होताच अपलोड करतात. त्यामुळे प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी थिएटरपर्यंत जातच नाहीत. त्यामुळे बॉलिवूडचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्याच्या परिस्थितीत बॉलिवूडचे काही अपवाद वगळता एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकलेला नाही. 

अजय देवगणच्या अभिनयाचं कौतुक

'दृश्यम 2' पाहिल्यानंतर प्रेक्षक अजय देवगणच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहेत. दृश्यम 2 सिनेमा पहिल्या भागाशी सुसंगत आहे, मांडणीही चांगली असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. हा एक उत्कृष्ट सिनेमा असल्याचं प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी