अजय देवगणच्या करिअरमधला सर्वांत सुपरहिट सिनेमा ठरला तान्हाजी

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Feb 01, 2020 | 15:15 IST

Tanhaji Box Office Collection: 10 जानेवारीला रिलीज झालेला तान्हाजीः द अनसंग वॉरियर अजय देवगणच्या करिअरमधला सर्वात मोठा सिनेमा बनला आहे. जाणून घ्या 22 दिवसात बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे. 

Ajay Devgn in TanhaJi
सुपरहिट सिनेमा तान्हाजीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन   |  फोटो सौजन्य: Instagram

Tanhaji Box Office Collection:  10 जानेवारीला रिलीज झालेला तान्हाजीः द अनसंग वॉरियर बॉक्स ऑफिसवर सर्वच रेकॉर्ड ब्रेक करक आहे. या सिनेमानंतर रिलीज झालेला कोणताच सिनेमा तान्हाजीचा मुकाबला करू शकला नाही. हा सिनेमा बॉलिवूड अॅक्टर अजय देवगणच्या करिअरमधला सर्वात मोठा सिनेमा बनला आहे. तर सैफ अली खानच्या करिअरमधलाही सर्वात यशस्वी सिनेमा ठरला. 

शुक्रवारी म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत या सिनेमानं जवळपास 240 कोटींची कमाई केली आहे. अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, शनिवार आणि रविवारच्या कलेक्शननंतर हा सिनेमा 250 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ठ होईल. या सिनेमाची टक्कर स्क्रीनवर मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला दीपिका पदुकोणच्या छपाक सिनेमाशी झाली होता. अॅसिड अटॅक सर्व्हावायर लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित हा सिनेमा तान्हाजीच्या समोर टिकू शकला नाही. 

तर 24 जानेवारीला रिलीज झालेला वरूण धवनचा  Street Dancer आणि कंगना राणावतचा पंगा सुद्धा तान्हाजीच्या कमाईला परिणाम करू शकला नाही. 31 जानेवारीला सैफ अली खानचा जवानी जानेमन सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा सुद्धा तान्हाजीची कमाई रोखू शकला नाही. हे महत्त्वाचं आहे की, 22 दिवसांमध्ये हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कसा ठरला. 

तान्हाजी सिनेमाची सक्सेस स्टोरी जाणून घेण्यासाठी आम्ही ट्रेड एनालिस्ट रोहित जयस्वाल आणि सुमित कादेल यांच्यासोबत बातचित केली. रोहित जयस्वालनं सांगितलं की, ओम राऊतनं हा सिनेमा खूप सुंदर बनवला आहे. अजय देवगणसहित सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका चोख निभावली आहे. सिनेमाच्या समीक्षकांनीही या सिनेमाचं कौतुक केलं आणि  त्यामुळे माऊथ पब्लिसिटीचा सिनेमाला फायदा झाला. छपाक सिनेमाला झालेल्या विरोधाचा फायदा तान्हाजी सिनेमाला झाला. 

ट्रेंड एनालिस्ट सुमित कादेलनुसार, तान्हाजी सिनेमा खूप चांगला आहे. प्रेषकांनाही ऐतिहासिक सिनेमे बघायला आवडतात. फक्त ते सिनेमे चांगल्या पद्धतीनं बनवणं आवश्यक आहे. सिनेमाचे 3D इफेक्ट खूप चांगलं आहे. हा अनुभव प्रेषकांच्या खूप पसंतीस उतरला. हा सिनेमा महाराष्ट्रीयन योद्धाची कथा आहे आणि महाराष्ट्रमध्ये या सिनेमाला खूप पसंती मिळाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी