Tanhaji Box Office Collection day 3: तिसऱ्या दिवशी अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमाची बंपर कमाई

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jan 13, 2020 | 13:40 IST

बॉलिवूड एक्टर अजय देवगणचा सिनेमा तान्हाजी द अनसंग वॉरियरनं कमाईमध्ये बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले आहेत. तिसऱ्या दिवशी सिनेमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. तीन दिवसात सिनेमानं हाफ सेंन्चुरी केली आहे.

Tanhaji Box Office Collection day 3
तिसऱ्या दिवशी अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमाची बंपर कमाई 

Tanhaji Box Office Collection day 3: बॉलिवूड एक्टर अजय देवगणचा सिनेमा तान्हाजी द अनसंग वॉरियरनं कमाईमध्ये बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले आहेत. तिसऱ्या दिवशी सिनेमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. तीन दिवसात सिनेमानं हाफ सेंन्चुरी केली आहे. 

ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांच्यानुसार, सिनेमा रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तान्हाजीची 26 कोटी रूपयांच्या आसपास कमाई झाली. या हिशोबानं आतापर्यंत या सिनेमाचं कलेक्शन 55.67 कोटी रूपयांवर पोहोचलं आहे. 

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांच्या अंदाजानुसार, तान्हाजी द अनसंग वॉरियरनं दुसऱ्या दिवशी 20.57 कोटी रूपयांचं कलेक्शन केलं आहे. पहिल्या दिवशी 15.10 कोटी रूपयांची कमाई केली होती. हा सिनेमा मेट्रो, मास बेल्ट, सिंगल स्क्रिन्स आणि मल्टीप्लेक्समध्ये खूप पसंतीस उतरत आहे. सिनेमा महाराष्ट्रात खूप पसंद केला जात आहे. सिनेमाला माउथ पब्लिसिटीचा जबरदस्त फायदा होत आहे. सिनेमानं पहिल्या दिवशी 15.10 कोटी रूपयांची कमाई केली आहे.  

 

 

तान्हाजी भारतात जवळपास 3880 स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. परदेशात 660 स्क्रिन्सवर सिनेमा रिलीज झाला. अशातच तान्हाजीला एकूण 4540 स्क्रिन्स मिळाले. हा सिनेमा 2D व्यतिरिक्त 3D मध्येही रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमानं दीपिका पदुकोणच्या छपाक सिनेमाला मागे टाकलं आहे. 

तान्हाजी द अनसंग वॉरियर हा शिवछत्रपतींच्या काळात घडलेल्या तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे. या  सिनेमातून अजय देवगण आणि काजोल यांची जोडीनं पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.  यात मराठा आणि मुघल यांच्यातलं युद्ध दाखवण्यात आलं आहे. सिनेमात अजय देवगण, सैफ आणि काजोल मुख्य भूमिकेत आहेत.  सिनेमात अजय देवगण सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहेत. तर उदयभान यांच्या रूपात दाखवलेला सैफ अली खान आपल्या अॅक्टिंगची प्रेक्षकांवर छाप सोडतो. अभिनेत्री काजोल सावित्रीबाई यांच्या भूमिकेत आहे. ओम राऊत दिग्दर्शित बनलेला हा सिनेमा अजय देवगणचा 100 वा सिनेमा आहे. या सिनेमात शरद केळकर, जगापति बाबू आणि पंकज त्रिपाठी यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी