TanhaJi Box office: 21 दिवसातली तान्हाजीची कमाई बघून व्हाल थक्क

बी टाऊन
पूजा विचारे
Updated Jan 31, 2020 | 13:50 IST

TanhaJi Box office Collection: 10 जानेवारीला रिलाज झालेला अजय देवगणचा सिनेमा तान्हाजी 21 दिवसांनंतरही थिएटरमध्ये टिकून आहे. या सिनेमानं आता 200 कोटींहून जास्त कमाई केली आहे.

Tanhaji Box office Collection
TanhaJi Box office: 21 दिवसातली तान्हाजीची कमाई बघून व्हाल थक्क 

TanhaJi Box office Collection: 10 जानेवारीला रिलीज झालेला बॉलिवूड अॅक्टर अजय देवगणचा सिनेमा तान्हाजीः द अनसंग वॉरिअर 21 दिवसांनंतरही थिएटरमध्ये टिकला असून सर्व सिनेमांवर भारी पडत आहे. आतापर्यंत तान्हाजी सिनेमानं एकूण 237.87 कोटी रूपयांची कमाई केली असून आणखीन यांच्या कमाई सुरूच आहे. लवकरच सिनेमा 250 कोटींचा आकडा पार करणार आहे. 

या सिनेमासोबत रिलीज झालेला दीपिका पदुकोणचा छपाक सिनेमाही या सिनेमासोबत मुकाबला करू शकला नाही. 24 जानेवारीला रिलीज झालेला वरूण धवन आणि श्रद्धा कपूर स्टाटर Street Dancer 3D आणि कंगना राणावत स्टारर पंगा रिलीज झाल्यानंतरही तान्हाजीच्या कमाईत ब्रेक लागला नाही. 

चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. यात तान्हाजी मालुसरेंची भूमिका अभिनेता अजय देवगननं साकारलीय. तर चित्रपटात अभिनेता सैफ अली खान उदयभान राठोड या निगेटिव्ह भूमिकेत दिसतोय. तर अभिनेत्री काजोल चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता शरद केळकरनं साकारलीय. तान्हाजी सिनेमा सैफ अली खान आणि काजोलचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. तान्हाजीनं टोटल धमालचं कलेक्शनला मागं टाकलं आहे. याव्यतिरिक्त गोलमाल अगेननंतर तान्हाजी अजय देवगणचा दुसरा मोठा सिनेमा ठरला आहे. 

तान्हाजी भारतात जवळपास 3880 स्क्रिन्सवर रिलीज झाला. परदेशात 660 स्क्रिन्सवर सिनेमा रिलीज झाला. अशातच तान्हाजीला एकूण 4540 स्क्रिन्स मिळाले. हा सिनेमा 2D व्यतिरिक्त 3D मध्येही रिलीज करण्यात आला. तरण आदर्श यांच्यानुसार, सिनेमाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि निजाम सर्किटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तान्हाजीनं याव्यतिरिक्त नॉर्थ इंडियामध्येही चांगलं कलेक्शन केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी