Akshay Khanna look changed : ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna) स्टारर 'ताल' हा चित्रपट सुपरहिट ठरला. ताल हा डान्स आणि संगीताने परिपूर्ण चित्रपट होता. चित्रपटात मानसीच्या भूमिकेत ऐश्वर्या राय खूपच सुंदर दिसत होती. तर अभिनेता अक्षय खन्नाने (Akshaye Khanna) मानवची भूमिका साकारली होती. 1997 मध्ये अक्षय खन्ना पूजा भट्टसोबत 'बॉर्डर' चित्रपटात दिसला होता. यानंतर हंगामा, हलचल, अनेक सिनेमांमध्ये त्याने भूमिका साकारल्या, मात्र त्यानंतर तो चित्रपटांमधून जवळजवळ गायब झाला. आणि आताचा त्याचा लूकसुद्धा खूप बदलला आहे.( Akshay Khanna look changed in latest photos can't recognized )
अतिशय देखणा दिसणाऱ्या अभिनेत्याचे केस खूपच कमी झाले आहेत. अक्षयला ९० च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून पाहिले जात होते.त्याच्या लूकमुळे त्याने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले होते. बॉर्डर नंतर, ताल, दिल चाहता है, हलचल,गांधी माय फादर, हमराज आणि हंगामा यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता.
अधिक वाचा : लय भारी ! दे धक्का २ चा ट्रेलर आऊट
तो बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना ( Vinod Khanna ) यांचा मुलगा आहे. अक्षय खन्नाने 90 आणि 2000 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि अनेक मोठ्या हिरोइन्सचा तो नायक होता. अक्षय खन्नाला 'दिल चाहता है' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, पण त्यानंतर त्याच्या करिअरचा आलेख घसरत गेला. तो जवळजवळ गायब झाला आणि अनेक वर्षांनी त्याने 2016 मध्ये आलेल्या 'ढिशूम' चित्रपटाद्वारे त्याने पुनरागमन केले.
अधिक वाचा : १२ कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलाय हा भारतीय क्रिकेटर
अक्षय खन्नाच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच उलथापालथ झालेली आहे. त्याचं नाव काही अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं होतं, पण आजपर्यंत त्यांनी लग्न केलं नाही. चरित्र कलाकारांपासून ते खलनायकाच्या भूमिकेपर्यंत अक्षय खन्नाने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. अक्षयने OTT पदार्पण केले आहे आणि 'G5' वर 'स्टेट ऑफ सीज - टेंपल अटॅक' यामध्ये अक्षयच्या अभिनयाची चुणूक पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळाली.