Akshay Kumar : अक्षय कुमार 'मर्दोंवाले प्रॉडक्ट' लाँच करणार

Akshay Kumar and Good Glamm Group JV to launch personal care and wellness products for men : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच एक कंपनी सुरू करत आहे.

Akshay Kumar
अक्षय कुमार 'मर्दोंवाले प्रॉडक्ट' लाँच करणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Akshay Kumar : अक्षय कुमार 'मर्दोंवाले प्रॉडक्ट' लाँच करणार
  • अक्षय कुमार आणि गुड ग्लॅम ग्रुप पुरुषांसाठीच्या ब्युटी प्रॉडक्टच्या क्षेत्रात संयुक्तपणे व्यवसाय करणार
  • प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि ब्रँड डेव्हलपमेंट यासाठीच्या प्लॅनवर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याचे सहकारी काम करणार

Akshay Kumar and Good Glamm Group JV to launch personal care and wellness products for men : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच एक कंपनी सुरू करत आहे. या कंपनीच्या माध्यमातून अक्षय कुमार 'मर्दोंवाले प्रॉडक्ट' बाजारात लाँच करणार आहे. पुरुषांसाठीची ब्युटीप्रॉडक्ट विकण्यासाठी अक्षय कुमार मोठ्या बिझनेस प्लॅनवर काम करत आहे. 

अक्षय कुमार आणि गुड ग्लॅम ग्रुप पुरुषांसाठीच्या ब्युटी प्रॉडक्टच्या क्षेत्रात संयुक्तपणे व्यवसाय करणार आहेत. यासाठी एका जॉइंट व्हेंचर अॅग्रीमेंटीवर दोन्ही बाजूने सह्या झाल्या आहेत. नवे जॉइंट व्हेंचर पुरुषांसाठी पर्सनल केअर आणि ब्युटी प्रॉडक्ट बाजारात लाँच करणार आहे. 

प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि ब्रँड डेव्हलपमेंट यासाठीच्या प्लॅनवर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याचे सहकारी काम करत आहेत. 'मी कायम फिटनेसवर भर दिला; आता विविध प्रॉडक्टच्या माध्यमातून नागरिकांना फिट राहा आणि सुंदर दिसा अशा स्वरुपाचा संदेश देणार आहे', असे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने सांगितले. 

गुड ग्लॅन ग्रुप सध्या महिलांसाठी पर्सनल केअर आणि ब्युटी प्रॉडक्ट तयार करण्याचे आणि विकण्याचे काम करत आहे. लवकरच कंपनी पुरुषांसाठीही पर्सनल केअर आणि ब्युटी प्रॉडक्ट बाजारात आणणार आहे. 

गुड ग्लॅन ग्रुपने 2021 मध्ये स्कूपव्हूप ही डिजिटल कंपनी ताब्यात घेतली. आता कंपनी त्यांच्या सर्व उत्पादनांची जाहिरात स्कूपव्हूप तसेच इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरून करण्याच्या तयारीत आहे. गुड ग्लॅन ग्रुपचे सीईओ सुखलीन अनेजा यांनीही कंपनी आक्रमक धोरण राबवून त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करणार असल्याचे संकेत दिले.

AI ने तयार केले दिग्गजांचे सेल्फी घेतानाचे फोटो

स्मार्टफोनचा स्फोट होण्याची कारणे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी