‘सूर्यवंशी’मध्ये पुन्हा दिसणार अक्की-कॅटची सुपरहिट जोडी

बी टाऊन
Updated Apr 22, 2019 | 19:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट कसा असेल जाणून घ्या या बातमीत...

akshay kumar and katrina kaif
अक्षय आणि कतरिना पुन्हा एकत्र (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई : अक्षय कुमार आणि कतरिना कैफची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधीही या जोडीनं अनेक एकापेक्षा एक हिट चित्रपट दिलेले आहेत. आता ही जोडी दिसणार आहे आगामी सिनेमा‘सूर्यवंशी’मध्ये. ही सिनेमा रोहित शेट्टीचा आहे. कॅटनं आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो टाकलाय. कॅट पहिल्यांदाच रोहित शेट्टीबरोबर काम करत असल्यानं खूप एक्साइटेड आहे.

कॅटनं इंस्टाग्रामवर फोटोबरोबरच कॅप्शन लिहिलं आहे. तिनं लिहीलं आहे की, “सूर्यवंशी फिल्मच्या टीमचा भाग बनून मला खूप आनंद झालाय. मी खूप एक्साईटेड आहे. रोहित शेट्टीबरोबर पहिल्यांदाच काम करत आहे. त्यातच अक्षयकुमार बरोबर खूप दिवसांनी काम करत असल्यानंही मी आनंदी आहे. तसंच धर्मा (प्रोडक्शन हाऊस) बरोबर काम करण्याची ही पहिलीच वेळ”, असल्याचं कतरिनानं लिहिलं.

 

 

अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आतापर्यंत त्यांनी अनेक हिट फिल्म्स दिल्या आहेत. यामध्ये ‘हमको दीवाना कर गये', ‘नमस्ते लंडन', ‘वेलकम', ‘सिंह इज किंग' यासारख्या एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. अक्षय कुमार आणि कतरिनाची जोडी पुन्हा एकदा १० वर्षानं एकत्र येत आहे. २०१० मध्ये दोघांनी 'तीस मार खां' हा अखेरचा चित्रपट एकत्र केला होता.


या फोटोमध्ये कतरिनाबरोबर अक्षय कुमार आहे तसंच रोहित शेट्टी आणि फिल्मचे सह-निर्माता करण जोहरही दिसत आहेत. अक्षय आणि करण जोहरनं ही ट्विटरवरून कतरिनाचं स्वागत केलंय. फिल्म ‘सूर्यवंशी’ २०२०मध्ये ईदच्या दरम्यान रिलीज होणार आहे.

यावर्षी धर्मा प्रोडक्शनच्या 'केसरी' आणि 'कलंक' या फिल्म बॉक्स ऑफिसवर चांगल्याच आपटल्या आहेत. त्यामुळं या फिल्ममुळं आधीच बराच तोटा उचलावा लागलाय. त्यातच 'स्टुडंट ऑफ द ईयर २' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

कतरिनानं या फिल्मसाठी खूप मोठी रक्कम मागितली असल्याची बातमी आहे. तर रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’नं बॉक्स ऑफिसवर धमाल केली असल्यानं सा फिल्मबाबत सर्वांनाच खूप उत्सुकता आहे.

अशी बातमी होती की ही फिल्म माजी एटीएस प्रमुख के पी रघुवंशी यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि या बायोपिकचे राइट्स त्यांच्यापाशीच आहेत पण नुकतंच रोहित शेट्टीच्या प्रोडक्शन हाऊस ने ही बातमी खरी नसल्याचं सांगितलं. ही एक वेगळी कहाणी आहे आणि याचा के पी रघुवंशी यांच्याशी काहीही संबंध नसल्याचंही  स्पष्ट केलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘सूर्यवंशी’मध्ये पुन्हा दिसणार अक्की-कॅटची सुपरहिट जोडी Description: अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट कसा असेल जाणून घ्या या बातमीत...
Loading...
Loading...
Loading...