Suryavanshi movie: अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या 'सूर्यवंशी'ने 23 व्या दिवशी केली इतकी कमाई, जाणून घ्या कलेक्शन

बी टाऊन
विजय तावडे
Updated Nov 29, 2021 | 13:44 IST

Suryavanshi movie: अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

Akshay Kumar and Katrina Kaif's 'Suryavanshi' box office collection
'सूर्यवंशी'ची बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच, अँक्शन-ड्रामाचा धमाका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'सूर्यवंशी'ची बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच
  • चित्रपटाचा आतापर्यंत 187 कोटींचा गल्ला
  • अँक्शन, ड्रामा आणि स्टंटचा तडका

Suryavanshi movie: मुंबई: अक्षय कुमार (Akshay Kumar), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'सूर्यवंशी' चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 23 दिवस झाले असले तरी त्याची जोरदार कमाई सुरू आहे. हा चित्रपट दररोज कोट्वधींची कमाई करत आहे. आता 23 व्या दिवशीही 'सूर्यवंशी'ने चांगली कमाई केली आहे. ‘सूर्यवंशी’ (Suryavanshi) च्या कमाईचा आकडा आता 200 कोटींच्या जवळ पोहोचला आहे.


अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ने 23व्या दिवशी म्हणजेच शनिवारी 1 कोटींची कमाई केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता चित्रपटाच्या कमाईचा एकूण आकडा 187 कोटींच्या पुढे गेला आहे. तरण आदर्शच्या ट्विटनुसार, शुक्रवारीही चित्रपटाने 85 लाखांची कमाई केली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबरला 'सूर्यवंशी' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.


'सूर्यवंशी' देशभरात 4 हजारहून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे, तर जगभरात तो 5 हजार 200 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची गोष्ट अक्षयची म्हणजेच डीसीपी वीर सूर्यवंशी याची आहे, जो आपल्या मतावर ठाम आहे आणि दहशतवादाविरुद्ध लढा देत आहे. या युद्धादरम्यान त्याला एका मोठ्या कटाची कल्पना येते आणि तो देश आणि मुंबई वाचवण्यासाठी निघतो. या कामात त्याच्यासोबत सिंघम अजय देवगण आणि सिम्बा रणवीर सिंग आहेत. अशाप्रकारे चित्रपटात अॅक्शन, ड्रामा आणि कार स्टंटसह हेलिकॉप्टरवर अॅक्शन सीन्स पाहायला मिळतात. रोहित शेट्टीच्या चित्रपटाची खासियत म्हणजे त्याच्या चित्रपटात बरीच पात्रं असतात. आणि ते सूर्यवंशीमध्येही पाहायला मिळत आहे.

तर दुसऱ्या बाजूला सलमान खानच्या अंतिमची आणि जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते २ ची चर्चा सुरू आहे. 
सलमानचा 'अंतिम' जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते 2'सोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर देत आहे. 'सत्यमेव जयते 2' आणि 'अंतिम'च्या एक दिवस आधी गुरुवारी (25 नोव्हेंबर) सिनेमागृहात रिलीज झाला आहे. आता 'अंतिम' रिलीज झाल्यानंतर 'सत्यमेव जयते 2'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 40-50 टक्क्यांची घसरण झाली आहे. 'सत्यमेव जयते 2' ने पहिल्या दिवशी 2.75 कोटींची कमाई केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटात सलमान खान एका सरदार पोलिसाच्या भूमिकेत आहे. यानंतरही पंजाब आणि दिल्ली सर्किटमध्ये या चित्रपटाची कामगिरी फारशी दिसून आलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी