Akshay Kumar Rasksha Bandhan Promotion : मिसळ-पाववर ताव मारत अक्षय कुमारने केलं 'रक्षाबंधन'चं प्रमोशन, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

बी टाऊन
Updated Aug 05, 2022 | 12:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Akshay Kumar Rasksha Bandhan Promotion : सिनेमाच्या प्रमोशनसाठी (Promotion ) ही स्टार कधी काय करतील याचा नेम नसतो, मग कधी पाणीपुरी खाणं असो, वडापाव खाणं असो किंवा थेट हॉटेलमध्ये बसून मिसळपाव खाणं असो. नुकतचं रक्षाबंधन सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमार ( Akshay Kumar ) आणि टीमने पुण्यात मिसळपाव खाण्याचा मनमुराद आनंद लुटला. पुण्यातील 'श्रीमंत मिसळ आणि बरंच काही' येथे 'रक्षाबंधन'च्या टीमने मिसळ-पाववर ताव मारला.

Akshay kumar ate misal pav during rakshabandhan promotion video viral
'रक्षाबंधन' प्रमोशनादरम्यान लुटला मिसळ-पावचा आस्वाद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'रक्षाबंधन' सिनेमाचे असेही प्रमोशन
  • अक्षय कुमारने पुण्यात लुटला मिसळ-पाव खाण्याचा मनमुराद आनंद
  • प्रमोशनसाठी केला सारा अट्टाहास

Akshay Kumar Rasksha Bandhan Promotion : सिनेमाच्या प्रमोशनसाठी (Promotion ) ही स्टार कधी काय करतील याचा नेम नसतो, मग कधी पाणीपुरी खाणं असो, वडापाव खाणं असो किंवा थेट हॉटेलमध्ये बसून मिसळपाव खाणं असो. असंच काहीसं घडलं बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थातच अक्षय कुमारच्या बाबतीत. सध्या तो सोशल मीडियावरील एका व्हिडिओमुळेखूपच चर्चेत आहे. अर्थात त्याच कारणही तसंच आहे म्हणा, सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी रक्षाबंधन सिनेमाच्या (Rakshabandhan Movie ) प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आणि या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमारने (Akshay Kumar )  चक्क मिसळ-पाववर ताव मारल्याचं पाहायला मिळालं. अक्षय कुमार मिसळ-पावचा आनंद लुटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ( Akshay kumar ate misal pav during rakshabandhan promotion video viral )

अधिक वाचा : जमिनीतून अचानक बाहेर आला बाळाचा हात


दमदार अभिनय आणि खिलाडी वृत्ती अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने (Akshay Kumar )  प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्याचा चाहता वर्गही फार मोठा आहे. अक्षय कुमारचा आगामी  'रक्षाबंधन' (Rakshabandhan Movie ) हा सिनेमा 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या अक्षय कुमार आणि सिनेमाची संपूर्ण टीम सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम पुण्यात गेली होती. आता पुण्याला जाऊन मिसळ खाण्याचा मोह अक्षय कुमारला झाला नसता तर  नवलंच म्हणावं लागेल. पुण्यातील ‘श्रीमंत मिसळ आणि बरंच काही’ येथे रक्षाबंधनच्या संपूर्ण टीमने मिसळ पाववर ताव मारला. त्याचा मिसळ पाव खातानाचा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. झणझणीत मिसळ खाण्याचा मोह अक्षय कुमारलाही आवरता आला नाही आणि त्याने मिसळ-पाववर ताव मारला. मिसळ-पावचा मनमुराद आनंद लुटतानाचा अक्षय कुमारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा : या राशींचे भाग्य 7 ऑगस्टपासून उजळणार, मिळेल भरपूर पैसा


अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘रक्षाबंधन’ टीमचा मिसळ पाव खातानाचा फोटो त्याने शेअर केला आहे. ‘प्रत्येक पुणेकराची जान आणि शान, मिसळपाव! मन आणि पोट दोन्ही भरलं आहे . श्रीमंत मिसळ आणि बरंच काहीचे खूप खूप धन्यवाद. खूप छान’, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


रक्षाबंधन’ चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हिमांशू शर्मा आणि कनिका ढिल्लो यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर आनंद एल राय यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा बहिण-भावाच्या नात्यावर असेल हे सिनेमाच्या नावावरूनच स्पष्ट होत आहे. आमीर खानच्या लाल सिंग चड्ढा सिनेमासोबत येत्या 11 ऑगस्टला अक्षय कुमारचा रक्षाबंधन सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहे. 'बच्चन पांडे', 'सम्राट पृथ्वीराज' हे दोन सिनेमा फ्लॉप ठरल्याने अक्षयला या सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आता अक्षयच्या या अपेक्षा पूर्ण होतात की नाही हे सिल्व्हर स्क्रीनवर सिनेमा रिलीज झाल्यानंतर कळेलंच

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी