अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह

Akshay Kumar Corona Positive, Under Home Quarantine बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोना झाला. अक्षयने ट्वीट करुन ही माहिती दिली.

Akshay Kumar Corona Positive, Under Home Quarantine
अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह 

थोडं पण कामाचं

  • अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह
  • अक्षय कुमार होम क्वारंटाइन
  • वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेत आहे अक्षय

मुंबईः बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोना झाला. अक्षयने ट्वीट करुन ही माहिती दिली. सध्या अक्षय कुमार होम क्वारंटाइन आहे. वैद्यकीय सल्ल्याने तो उपचार घेत आहे. अक्षयने मागील एक-दोन आठवड्यात त्याच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचा आणि बरे वाटत नसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. मनात शंका असेल तर स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्या. मास्क घाला, सोशल डिस्टंस पाळा आणि सर्व कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करा; असे आवाहन बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने नागरिकांना केले. (Akshay Kumar Corona Positive, Under Home Quarantine)

अक्षय कुमार उत्तर प्रदेशमध्ये 'राम सेतू' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होता. तिथेच अक्षयला कोरोनाची बाधा झाली. 'राम सेतू' या सिनेमात अक्षयसोबत जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा या दोघी काम करत आहेत. अक्षय 'राम सेतू' सिनेमात एका इतिहास अभ्यासकाच्या (पुरातत्ववेता) भूमिकेत आहे. 'राम सेतू' व्यक्तिरिक्त अक्षय कुमार अयाननंद एल रायच्या 'अतरंगी रे', फरहाद समजीच्या 'बच्चन पांडे', रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' आणि रंजित तिवारीच्या 'बेल बॉटम' सिनेमात आहे.

महाराष्ट्रात एका दिवसात ४९,४४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कडक निर्बंध लावावे की लॉकडाऊन लागू करावा याचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र राज्यात एका दिवसात ४९ हजार ४४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात २४ तासांत २७७ कोरोना मृत्यू झाले. दिवसभरात ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले. 

आतापर्यंत महाराष्ट्रात २९ लाख ५३ हजार ५२३ जण कोरोनाबाधीत झाले. यापैकी २४ लाख ९५ हजार ३१५ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे ५५ हजार ६५६ जणांचा मृत्यू झाला. कोरोना झालेल्या १ हजार ३८० जणांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला. राज्यात सध्या ४ लाख १ हजार १७२ जण कोरोना अॅक्टिव्ह आहेत. 

राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८४.४९ टक्के आहे. राज्याचा कोरोना मृत्यू दर १.८८ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत तपासलेल्या २ कोटी ३ लाख ४३ हजार १२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९ लाख ५३ हजार ५२३ कोरोनाबाधीत आढळले. यामुळे प्रयोगशाळा नमुन्यांचा विचार केल्यास राज्यात १४.५२ टक्के नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. महाराष्ट्रात सध्या २१ लाख ५७ हजार १३५ जण होमक्वारंटाइन आणि १८ हजार ९९४ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी