समांथाच्या अदा पाहून Akshay Kumar ला राहवलं नाही, ‘ Oo Antava’ गाण्यावर सिजलिंग डान्स, व्हिडिओ व्हायरल

samantha dances with akshay kumar समंथा रुथ प्रभू आणि अक्षय कुमार करण जोहरच्या कॉफी विथ करण सीझन 7 च्या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Akshay Kumar couldn't stop watching Samantha's performance, sizzling dance on 'Oo Antava' song, video goes viral
समांथाच्या अदा पाहून Akshay Kumar ला राहवलं नाही, ‘ Oo Antava’ गाण्यावर सिजलिंग डान्स, व्हिडिओ व्हायरल ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'पुष्पा'च्या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना अक्षय आणि समंथा व्हिडिओ व्हायरल
  • ऊ अंटावा गाण्याचे सिग्नेचर स्टेप करत आहे.
  • अक्षयही समंथासोबत डान्सचा भरपूर आनंद घेताना दिसला.

Koffee With Karan 7: 'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन मजेदार खुलाशांसह परतला आहे. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये, जिथे आलिया भट्ट (Alia Bhatt)आणि रणवीर सिंग(Ranveer Singh) यांनी त्यांची गुपिते उघड करून आणि मजा करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले, दुसऱ्या भागात, बी-टाउन बेस्टी सारा अली खान  (Sara Ali Khan)आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांनी मस्ती-मस्करी केली. दोन्ही भाग खूप आवडले होते, पण तिसरा भाग आणखी जबरदस्त असणार आहे, कारण यात चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज स्टार्सची एन्ट्री होणार आहे. (Akshay Kumar couldn't stop watching Samantha's performance, sizzling dance on 'Oo Antava' song, video goes viral)

अधिक वाचा : Actress Kareena Kapoor Khan Pregnancy: करीना कपूर तिसऱ्यांदा Pregnant?,चर्चेवर दिलं बेबो स्टाईल फनी उत्तर; म्हणाली...

'कॉफी विथ करण 7' च्या तिसऱ्या पर्वाचे पाहुणे आहेत दक्षिण इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha)आणि बॉलिवूडचा 'अक्की' म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar). दोघेही त्यांच्या मजेदार विनोदाने शोमध्ये खूप मजा करतील आणि शोचा होस्ट करण जोहरसाठी क्लासेस घेतानाही दिसणार आहेत. शोचा नवीनतम प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षय आणि सामंथा यांनी त्यांच्या किलर डान्सने आग लावली आहे.

शोचा नवीनतम प्रोमो व्हिडिओ 'डिस्ने प्लस हॉटस्टार'च्या इन्स्टा पेजवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये सामंथा तिच्या 'ओ अंतवा' गाण्यावर अक्षय कुमारसोबत सिग्नेचर सीन तयार करताना दिसत आहे. दोघांचा हा डान्सही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. लाल रंगाच्या टॉप आणि गुलाबी पॅंटमध्ये सामंथा खूपच सुंदर दिसत आहे, तर अक्षयही ब्लू कलरच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अक्षय आणि सामंथाचा हा भाग 21 जुलै 2022 रोजी 'डिस्ने प्लस हॉटस्टार' वर दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी