Akshay Kumar South Movie Remake : साऊथ चित्रपटांचे रिमेक (South Film Remake) हे बॉलिवूडमध्ये हिट फॉर्म्युला मानले जाते. दरवर्षी साऊथच्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे हिंदी रिमेक बनतात, त्यातील काही यशस्वी ठरतात तर काही फ्लॉप होतात. अक्षय कुमारही (Akshay Kumar ) दरवर्षी कोणत्या ना कोणत्या साऊथच्या चित्रपटाचा रिमेक घेऊन येतो. सध्या तो त्याच्या रक्षाबंधन (Rakshabandhan ) चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशामुळे चर्चेत आहे. ( Akshay kumar film cuttputlli south remake of ratsanan to bachchhan paandey selfiee)
'रक्षा बंधन' हा अक्षय कुमारचा या वर्षी आलेला तिसरा चित्रपट आहे, जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला आहे. त्याचवेळी आता खिलाडी कुमार आपला नवा चित्रपट 'कटपुतली' घेऊन आला आहे, जो साऊथच्या चित्रपटाचा रिमेक आहे. अक्षय कुमारने याआधीही साऊथच्या रिमेक सिनेमांमध्ये काम केलेलं आहे.
रणजीत एम तिवारी दिग्दर्शित कटपुतली सिनेमाचे नाव आधी 'मिशन सिंड्रेला' होते.या चित्रपटात रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा तमिळ सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर 'रत्सासन' चा रिमेक आहे. 4 ते 5 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'रत्सासन'ने बॉक्स ऑफिसवर 50.54 कोटींचा व्यवसाय केला. 'रत्सासन'च्या हिंदी डब व्हर्जनचे नाव 'मैं हूं दंडाधिकारी' आहे. अक्षय कुमारचा चित्रपट बेलबॉटमच्या अपयशानंतर, कटपुतली OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता तो 2 सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर येईल. पण ओटीटीवर आल्यानंतरही प्रेक्षक या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देतील का हे पाहावे लागेल. यानंतर तो इमरान हाश्मीसोबत 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा रिमेक असलेल्या 'सेल्फी'मध्ये दिसणार आहे.
अधिक वाचा : शेतकरी पुन्हा दिल्लीच्या दिशेने
यावर्षी अक्षय कुमारचा क्रिती सेनॉन आणि अर्शद वारसीसोबत 'बच्चन पांडे' सिनेमा रिलीज झाला. 'बच्चन पांडे' हा बॉबी सिम्हा दिग्दर्शित तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट 'जिगरथंडा'चा रिमेक आहे. 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 49.98 कोटींची कमाई करू शकला आणि तो फ्लॉप ठरला. तर 'जिगरथंडा' या तमिळ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला तो 50 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता.
अधिक वाचा : UPI पेमेंटवर लागणार शुल्क? RBI नियम आणण्याच्या तयारीत
लक्ष्मी (2020)
अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याचवेळी त्याचा तामिळ चित्रपट 'कंचना' ब्लॉकबस्टर ठरला. राघव लॉरेन्स दिग्दर्शित या चित्रपटात कियारा अडवाणी आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 'कंचना'ने बॉक्स ऑफिसवर 130 कोटींची कमाई केली.
अक्षय कुमार आणि श्रुती हासन स्टारर गब्बर हा एआर मुरुगदास यांच्या तामिळ चित्रपट 'रमन्ना'चा रिमेक आहे. 6 कोटींच्या कमी बजेटमध्ये बनलेल्या 'रमन्ना'ने 30 ते 40 कोटींचा व्यवसाय केला, तर 'गब्बर' 79 कोटींच्या बजेटमध्ये बनला आणि बॉक्स ऑफिसवर 87.55 कोटींची कमाई केली. दोन्ही चित्रपट हिट ठरले.
अधिक वाचा : समलिंगींना सेक्सची परवानगी पण लग्नासाठी मनाई, ३७७ ए रद्द
'हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी' हा तमिळ चित्रपट 'थुप्पाक्की'चा हिंदी सिक्वेल होता. हॉलिडेमध्ये अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते आणि 'थुप्पाक्की' मध्ये विजय आणि काजल अग्रवाल यांनी भूमिका केल्या होत्या. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन एआर मुरुगदास यांनी केले होते आणि दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.
प्रभू देवा दिग्दर्शित, राउडी राठौर हा 2006 मधील तेलुगु चित्रपट विक्रमार्कुडूचा रिमेक आहे. 'विक्रमकुडू'चे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले होते. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. राउडी राठौरने बॉक्स ऑफिसवर 133.25 कोटींचा व्यवसाय केला.