Prithviraj Official Trailer : दमदार स्टारकास्ट असलेला पृथ्वीराजचा ट्रेलर प्रदर्शित, थोड्याच वेळात ट्रेलरला लाखो व्ह्युज

बहुप्रतिक्षित चित्रपट पृथ्वीराजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुख्य भूमिकेत अक्षय कुमार असून संजय दत्त सोनू सूद, मानुषी छिल्लर अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटासाठी तब्बल १२ वर्षे मेहनत घेतली होती.

Prithviraj Official Trailer
पृथ्वीराज ट्रेलर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बहुप्रतिक्षित चित्रपट पृथ्वीराजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
  • मुख्य भूमिकेत अक्षय कुमार असून संजय दत्त सोनू सूद, मानुषी छिल्लर अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे.
  • दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटासाठी तब्बल १२ वर्षे मेहनत घेतली होती.

Prithviraj Official Trailer : मुंबई : बहुप्रतिक्षित चित्रपट पृथ्वीराजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुख्य भूमिकेत अक्षय कुमार असून संजय दत्त सोनू सूद, मानुषी छिल्लर अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटासाठी तब्बल १२ वर्षे मेहनत घेतली होती. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चांद बरदाई यांच्या पृथ्वीराज रासो यांच्या कवितेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटासाठी आधी सनी देओल आणि ऐश्वर्या राय यांची निवड करण्यात आली होती. परंतु काही कारणांमुळे हे होऊ शकले नाही. त्यानंतर अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांची निवड झाली. २०१० साली चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली. परंतु त्यांना या चित्रपटासाठी निर्मातेच मिळत नव्हते. अखेर २०१८ मध्ये यश राज या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती करण्यास तयारी दाखवली. कोरोनामुळे या चित्रपटाची शूटिंग आणि प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली होती. ३०० कोटी रुपये बजेट असलेला पृथ्वीराज आता प्रदर्शनासाठी मोकळा आहे. अखेर ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी