अक्षय कुमारच्या आईचं निधन

बॉलवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या आईचं निधन झालं. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांना तब्येत ढासळल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले होते.

akshay kumar mother aruna bhatia died actor informs fans
अक्षय कुमारच्या आईचं निधन 

थोडं पण कामाचं

  • अक्षय कुमारच्या आईचं निधन
  • अरुणा भाटिया यांना तब्येत ढासळल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले होते
  • अक्षय कुमारने ट्वीट करुन आईच्या निधनाची माहिती दिली

मुंबईः बॉलवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या आईचं निधन झालं. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांना तब्येत ढासळल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले होते. पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. अक्षय कुमारने ट्वीट करुन आईच्या निधनाची माहिती दिली. akshay kumar mother aruna bhatia died actor informs fans in an emotional post

आईची तब्येत बिघडल्याचे कळले त्यावेळी अक्षय कुमार लंडनमध्ये शूटिंग करत होता. तो तातडीने मुंबईत आला. त्यानेच ट्वीट करुन आईची तब्येत बिघडल्याचे फॅन्सना सांगितले होते. अक्षयच्या अनेक फॅन्सनी त्याच्या आईच्या तब्येतीला लवकर आराम पडावा यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. 

ट्वीट करुन व्यक्त केल्या भावना

कोणत्याही मुलासाठी त्याच्या आईचे निधन हा मोठा दुःखद आणि वेदनादायी प्रसंग असतो. आज या भावनांची जाणीव होत आहे. ती माझं सामर्थ्य होती. तिच्या जाण्याने आज खूप वेदना होत आहेत. आज सकाळीच माझी आई अरुणा भाटिया यांचं निधन झालं. आता ती माझ्या वडिलांसोत दुसऱ्या जगात विश्रांती घेत असेल. या शब्दात अक्षय कुमारने ट्वीट करुन भावना व्यक्त केल्या होत्या. 

याआधी अक्षय कुमारने अनेकदा आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रामुख्याने सणांच्या दिवसांत अक्षय आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी