नवी दिल्ली: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) मोस्ट अवेटेड सिनेमा रक्षाबंधनचा ट्रेलर (Raksha Bandhan Trailer ) आज रिलीज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रक्षाबंधन सिनेमाचा ट्रेलर लोकांच्या पसंतीस पडला आहे. यूट्यूबवर अपलोड केलेल्या या ट्रेलरच्या कमेंट बॉक्समध्ये लोकं जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत. (Raksha Bandhan Trailer Release)
या सिनेमाचा ट्रेलर पाहून अक्षय कुमारचा आणखी एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा हंगामा करण्याच्या तयारीत आहे. सिनेमाची स्टोरी ही चार बहिणी आणि एक भावाची आहे. सिनेमात अक्षयला आपल्या चार बहिणींचं लग्न करायचं आहे, पण ते कसं?, असा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हा सिनेमा पाहिल्यावरच मिळेल. ट्रेलरमध्ये अक्षयजवळ चार बहिणीचं लग्न करण्यासाठी तेवढे पैसे नाही आहेत.
काही दिवसांपूर्वीच अक्षयनं सिनेमाचा नवीन पोस्टर शेअर केला होता. नवा पोस्टर शेअर करताना अक्षयनं म्हटलं होतं की, येत्या मंगळवारी सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला जाणार आहे आणि तेव्हापासून लोकांना या सिनेमाचा ट्रेलर पाहण्याची उत्सुकता लागली होती.
रक्षाबंधन सिनेमा एक कौटुंबिक सिनेमा असून आनंद एल राय यांनी डायरेक्ट केला आहे.
सिनेमात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर लीड रोलमध्ये आहे. ट्रेलरच्या आधी सिनेमाचा नवीन पोस्टर अक्षय कुमारनं शेअर केलं होतं. ज्यात त्यानं आपल्या ऑनस्क्रिन बहिणींसोबत दिसला होता. अक्षय कुमारचा रक्षाबंधन सिनेमा 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी लोकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. रक्षाबंधन 11 ऑगस्टला रिलीज झाल्यानंतर सिनेमाचा चांगलाच गल्ला होण्याची शक्यता आहे.
अक्षय कुमारचा सिनेमा रक्षाबंधनच्या माध्यमातून आनंद एल रायसोबत दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. याआधी दोघांनी अतरंगी रे या सिनेमात एकत्रित काम केलं होतं. ज्यात सारा अली खान आणि धनुष सुद्धा होते. याव्यतिरिक्त अक्षय भूमि पेडणेकर सोबतही दुसऱ्यांदा काम करत आहेत. याआधी दोघांनी टॉयलेटः एक प्रेम कथामध्ये एकत्रित काम केलं होतं.