Akshay kumar highest tax payer : खिलाडी कुमारच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा, सर्वाधिक कर भरणारा करदाता म्हणून IT कडून सन्मान

बी टाऊन
Updated Jul 25, 2022 | 14:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Akshay Kumar highest taxpayer: अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्वाधिक कर भरणारा करदाता म्हणून अक्षय कुमारचा IT विभागाकडून सन्मान करण्यात आला आहे.

Akshay Kumar highest taxpayer
अक्षय कुमार पुन्हा एकदा सर्वाधिक कर भरणारा करदाता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अक्षय कुमारने पुन्हा एकदा सर्वाधिक कर भरला आहे
  • बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक कर भरणारा अभिनेता बनला आहे
  • अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे

Akshay Kumar highest taxpayer: अक्षय कुमार पुन्हा एकदा बॉलिवूडमधील सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे. 'खिलाडी' कुमारला आयकर विभागाकडून 'सन्मान पत्र'ही मिळाले आहे. अक्षय सध्या यूकेमध्ये टिनू देसाईसोबत त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अक्षयकडून त्याच्या टीमला हे सन्मान प्रमाणपत्र देण्यात आले. पिंकव्हिला मधील एका अहवालात असे म्हटले आहे की अक्षय कुमार आणि त्याच्या चाहत्यांसाठी हे आश्चर्यकारक नाही कारण सुपरस्टार गेल्या पाच वर्षांत सातत्याने भारतातील सर्वाधिक करदात्यांच्या यादीत आहे. ( Akshay Kumar once again highest taxpayer honored by IT dept )

गेल्या वेळी अक्षय कुमारने २९.५ कोटी रुपये कर भरल्याची बातमी आली होती. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्यात वाढ झाली आहे. याआधी अमिताभ बच्चन यांनी 77 कोटी रुपये कर भरला होता. त्यांच्यानंतर सलमान खान या यादीत होता जो 44 कोटींचा कर भरायचा. मात्र, या दोघांना मागे टाकत अक्षय कुमार पुन्हा एकदा सर्वाधिक कर भरणारा करदाता ठरला आहे. 

अधिक वाचा : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल


या वर्षी अक्षय कुमारच्या चाहत्यांनी त्याला बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराजच्या भूमिकेत पाहिले होते. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. आता सर्वांच्या नजरा रक्षाबंधन, राम सेतू, सेल्फी आणि इतर अनेक गोष्टींवर आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त अक्षय कुमार अनेक ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि अनेक जाहिरातींमध्ये तो दिसला आहे.

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. अक्षय वर्षभरात किमान ३-४ चित्रपटांमध्ये दिसतो, जे सहसा जास्त बजेट असतात. अनेकदा त्याचे चित्रपट हिट होतात, यावर्षी मात्र हे गणित जरा बिघडले आहे. अक्षयचे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकले नाहीत. 

अधिक वाचा : पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज


अक्षय कुमार चित्रपट आणि जाहिरातींमधून भरपूर कमाई करतो आणि भरपूर कर भरतो. त्यामुळेच तो सर्वाधिक कर भरणारा बॉलिवूड अभिनेता बनला आहे. अक्षय कुमार  'सम्राट पृथ्वीराज'मध्ये मानुषी छिल्लरसोबत दिसला होता. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरला. अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी