The Kashmir Files: 'द काश्मीर फाइल्स'साठी अक्षय कुमार निर्मात्यांची पहिली पसंती होती? निर्मात्यानेच सांगितले नेमकं काय आहे सत्य

बी टाऊन
Updated Apr 03, 2022 | 16:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

The Kashmir Files: चित्रपटात 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि त्या हत्याकांडाची कथा आहे जी सत्य तुमच्यासमोर अगदी सरळ पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

 Akshay Kumar was first choice for The Kashmir Files?
काश्मीर फाइल्ससाठी अक्षय कुमारला पहिली पसंती?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काश्मीर फाइल्ससाठी अक्षय कुमार निर्मात्यांची पहिली पसंती?
  • दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री जेव्हा भावूक होतात
  • सिनेमाच्या पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल

The Kashmir Files: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार कमी चित्रपट करू शकतील असा करिष्मा साकारला आहे. कमी बजेट, कमी स्क्रीन आणि खूपच कमी जाहिराती असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. आता हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे, त्याबद्दलच्या सर्व प्रकारच्या खऱ्या-खोट्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या आहेत. या चित्रपटासाठी विवेकने अक्षय कुमारला अप्रोच केल्याची बातमीही सोशल मीडियावर अलीकडेच आली आहे. पण हे खरे आहे का?

या सिनेमासाठी अक्षय कुमारला निर्मात्यांची पहिली पसंती होती

आता चित्रपटाचा निर्माता अभिषेक याने या प्रश्नाचे उत्तर देताना अशा बातम्या निव्वळ बकवास असल्याचे सांगितले आहे. योग्य माहिती अशी की, या चित्रपटासाठी निर्मात्यांनी अक्षय कुमारला कधीही संपर्क साधला नाही. 'द कश्मीर फाइल्स'मध्ये अनुपम खेर, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्याची माहिती आहे.


दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ढसाढसा रडले होते

चित्रपटाचा पडद्यामागचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुष्करनाथच्या मृत्यूच्या दृश्यावर भावूक होताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये विवेक अग्निहोत्री रडताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे अनेक मेकिंग व्हिडिओ समोर आले आहेत आणि या सर्वांमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की, या चित्रपटाबद्दल विवेक अग्निहोत्री यांना सुरुवातीपासूनच खूप विश्वास होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)


अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आले आहे

चित्रपटाची कथा 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि त्या हत्याकांडाची आहे. ही कथा हे सत्य तुमच्यासमोर अगदी सरळ पद्धतीने मांडते. हा चित्रपट आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे आणि आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व दिग्गजांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी