Samrat Prithviraj, Vikarm And Major OTT Release: बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपट शुक्रवारी म्हणजेच ३ जून रोजी रिलीज झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर एकीकडे अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. तर दुसरीकडे कमल हसनच्या 'विक्रम' चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. तसेच आदिवी शेष यांचा 'मेजर' हा चित्रपट महेश बाबूच्या निर्मितीत बनला आहे. त्याचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन सर्वात कमी आहे. मात्र, चाहते आता हे चित्रपट OTT वर पाहण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळेच हे चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहेत.
अक्षय कुमारने बच्चन पांडे या चित्रपटातही मुख्य भूमिका साकारली होती. 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाचे डिजिटल हक्क अॅमेझॉन प्राइम व्हिडिओला देण्यात आले आहेत.
त्याच्या OTT रिलीझबद्दल बोलायचे झाले तर ते 29 जुलै किंवा त्यानंतर कधीही रिलीज होऊ शकते. बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी झाली तर ओटीटी रिलीजची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.
आदिवी शेष दिग्दर्शित 'मेजर'सिनेमाचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार नेटफ्लिक्सकडे आहेत. या चित्रपटाच्या टीमने नुकतेच सांगितले की,चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर 60 दिवसांनी हा चित्रपट OTT वर येईल. यावरून अंदाज लावता येतो की,आदिवीचा हा चित्रपट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात OTT वर रिलीज होणार आहे. अद्याप निर्मात्यांनी रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही.
साऊथ इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत कमल हसन यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. कमल हसनचा विक्रम बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे.यासोबतच त्यांचे चाहते OTT वर रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कमल हासन, विजय सेतुपती आणि फहाद फासिल यांच्या 'विक्रम' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल बोलताना, निर्मात्यांनी 'विक्रम' चित्रपटाचे सर्व भाषा अधिकार OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar ला विकले आहेत. मात्र अद्याप त्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.