Ala Vaikunthapurramuloo Hindi Remake: पुष्पाच्या यशानंतर अल्लू अर्जुनचा आणखी एक सिनेमा, तर पुष्पा सिनेमाला अमूलकडून क्यूट ट्रिब्युट

बी टाऊन
Updated Jan 17, 2022 | 19:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Allu arjun Rocks : अल्लू अर्जुनचा ‘अला वेंकुटापुररामुलू’चा हिंदी रिमेक थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे, अमूल कंपनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पुष्पा सिनेमाला क्युट ट्रिब्युट दिलेले आहे.

Ala Vaikunthapurramuloo Hindi Remake and cute tribute to Pushpa movie from Amul
अला वेंकुटापुररामुलू’चा हिंदी रिमेक थिएटरमध्ये रिलीज होणार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ‘अला वेंकुटापुररामुलू’चा हिंदी रिमेक थिएटरमध्ये रिलीज होणार
  • पुष्पा सिनेमाला अमूलकडून क्युट ट्रिब्युट
  • पुष्पाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 400 कोटींच्या आसपास पोहोचले आहे

Ala Vaikunthapurramuloo Hindi Remake: साऊथचा स्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा (Pushpa The Rise) हा सिनेमा गेल्या वर्षी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. पुष्पा द राइजची हिंदी आवृत्ती चांगलीच पसंतीस उतरली आहे. या सिनेमाने थिएटरमध्ये चांगली कमाई केली आहे. गेल्या महिन्यात हिंदीत डब करून रिलीज झालेल्या 'पुष्पा' या तेलुगू सिनेमाच्या यशानंतर आता अल्लू अर्जुनची बॉलिवूडमध्येही क्रेझ वाढत आहे. अशातच आता अल्लू अर्जुनचा आणखी एक सिनेमा हिंदीत रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

 'पुष्पा'ला हिंदीमध्ये मिळालेले अफाट यश पाहता, त्याचा हिट तेलुगू सिनेमा 'अला वैकुंठापुरमुलू' (Ala Vaikunthapurramuloo) (2020) हिंदीत डब करून रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा चित्रपट पुढील आठवड्यात म्हणजेच २६ जानेवारीला देशभरातील चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

Ala Vaikunthapurramuloo Review: Five reasons to watch Allu Arjun and Pooja Hegde starrer

'अला वेंकुटापुररामुलू' (Ala Vaikunthapurramuloo) एक सुपरहिट सिनेमा आहे. आणि त्याने बॉक्स ऑफिसवर एकूण 160 कोटींचा व्यवसाय केला. हिंदीत डब केलेल्या 'पुष्पा'ने आतापर्यंत 86 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे, तर बॉक्स ऑफिसचे एकूण कलेक्शन 400 कोटींच्या जवळ पोहोचले आहे.

12 जानेवारी 2020 रोजी तेलुगुमध्ये रिलीज झालेला 'अला वेंकुटापुरामुलू' हा चित्रपट खूप हिट ठरला, अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, पूजा हेगडे, तब्बू, समुथिरकनी देखील मुख्य भूमिकेत होते तर चित्रपटाचे दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केले होते. विशेष म्हणजे, 'अला वेंकुटापुररामुलू' ची तेलुगु आवृत्ती आधीच नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

तर दुसरीकडे, पुष्पा सिनेमाबद्दल अमूलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले आहे की हा नवीन अॅक्शन ड्रामा सिनेमा खूप हिट ठरला आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये कार्टूनच्या माध्यमातून सिनेमातील दृश्याची झलक दाखवण्यात आली आहे. त्यात नायक लोणी खाताना दिसत आहे. हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकांनाही हा सिनेमा खूप आवडत आहे. पुष्पा हा चित्रपट हिंदीसह दक्षिण भारतीय भाषांमध्ये रिलीज झाला. बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याने अल्लू अर्जुनला या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत आवाज दिला आहे.

त्याचवेळी, ही जाहिरात पाहिल्यानंतर अल्लू अर्जुनची टिप्पणी देखील आली आहे, अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अमूलच्या टीमचे आभार मानले आहेत. 
अल्लू अर्जुनने कमेंटमध्ये लिहिले आहे, Allu to Mallu to Amallulru Arjun'तर अँमेझॉन प्राईम व्हिडिओने पोस्ट केले आहे की, this butter is not flower, it is fire 🧈' ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

पुष्पा सिनेमाचा सिक्वेल येणार  असल्याचं म्हटलं जात आहे. फेब्रुवारी महिन्यापासून या सिक्वेलच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. आणि याच वर्षाच्या अखेरीस पुष्पाचा सिक्वेल रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याचे नाव पुष्पा द रुल असेल. या चित्रपटात अल्लूसोबत रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी