Ranbir Alia Wedding: फक्त 'या' एका व्यक्तीसाठी रणबीर-आलियाच्या लग्नाची होतेय 'लगीनघाई'

बी टाऊन
Updated Apr 05, 2022 | 16:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranbir Kapoor Alia Bhatt | सध्या बॉलिवूडमध्ये फक्त एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे आलिया आणि रणबीरच्या बहुचर्चित लग्नाची. सर्व चाहते या लग्नाच्या प्रतिक्षेत होते अखेर या जोडप्याने लग्नाचा मुहूर्त देखील जाहीर केला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट १७ एप्रिल २०२२ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.

Alia and Ranbir are getting married early for only one person
फक्त एका व्यक्तीसाठी रणबीर-आलियाच्या लग्नाची होतेय 'लगीनघाई"  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या बॉलिवूडमध्ये आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
  • रणबीर कपूर आणि आलिया भट्ट १७ एप्रिल २०२२ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.
  • चेंबूर येथील आर के हाउसमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा होणार असल्याची माहिती आहे

Ranbir Kapoor Alia Bhatt | मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये फक्त एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे आलिया आणि रणबीरच्या बहुचर्चित लग्नाची. सर्व चाहते या लग्नाच्या प्रतिक्षेत होते अखेर या जोडप्याने लग्नाचा मुहूर्त देखील जाहीर केला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट १७ एप्रिल २०२२ रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. लवकरच दोन्हीही लोकप्रिय कलाकार त्यांच्या प्रेमाला नवीन ओळख देण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र या लग्नाची एवढी लगीनघाई का केली जात आहे याबाबत चाहत्यांच्या मनात संभ्रम असल्याचे बोलले जात आहे. (Alia and Ranbir are getting married early for only one person). 

अधिक वाचा : संजय राऊतांची मुंबई आणि अलिबागमधली संपत्ती जप्त

माहितीनुसार, आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख काही दिवसांनी मागे घेण्यात आली आहे. कारण आलियाचे आजोबा एन.राझदान यांची प्रकृती खालावल्यामुळे तसेच आपल्या नातीचा लग्नसोहळा पाहण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्नाची घाई केली जात असल्याचे कळते. आगामी काळात या संपू्र्ण गोतावळ्यात आलिया आणि रणबीर आपल्या कामात व्यस्त असणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे लग्नसोहळा पार पडल्यानंतर आलिया लगेचच तिच्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटींगसाठी रवाना होणार असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा : एड्सबाधित काकीने रचला कट, अल्पवयीन पुतण्याशी ठेवले संबंध

साहजिकच कोरोनाचा काळ आता बहुधा संपलेला असून निर्बंधही बऱ्याच अंशी मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या बहुचर्चित विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळीची उपस्थिती असणार आहे. प्रमुख पाहुण्यांच्या यादीत दोन्ही वधू वरांचे खास मित्र अर्जुन कपूर, अयान मुखर्जी, आदित्य रॉय कपूर, दीपिका पादुकोण आणि रणवीर यांची नावे अग्रस्थानी असण्याची शक्यता आहे. 

कुठे होणार विवाह सोहळा

दरम्यान, चेंबूर येथे असलेल्या आर के हाउस (RK House) मध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा होणार असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर आलिया लग्नाआधी स्पिन्स्टर्स आणि रणबीर बॅचलर्स पार्टीची तयारी करत आहे. लक्षणीय बाब म्हणजे रणबीरच्या बॅचलर्ससाठी अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर, अयान मुखर्जी इत्यांदीची उपस्थिती निश्चित असल्याचे सांगण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी