आलिया-रणबीरच्या पार्टीत 'या' जोडीची कुणाला आली फार आठवण?

बी टाऊन
Updated May 25, 2019 | 22:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर रात्री उशिरापर्यंत पार्टी करण्याच्या मूड मध्ये होते. पार्टीचे फोटा व्हायरल होत आहेत. रणबीर आलियाची ही पार्टी आता चर्चेचा विषय बनतं आहे. जाणून घ्या व्हायरल फोटो मागचं सत्य

alia bhat ranbir kapoor party
आलिया भट्ट रणबीर कपूर पार्टी  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे कपल नेहमीच त्यांच्या प्रेम संबंधामुळे चर्चेत असतं. जेव्हा-जेव्हा हे कपल सोबत दिसतात तेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. मागील काही दिवसांपासून रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. 

त्यातच आता शुक्रवारी रात्री आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत पार्टी करताना दिसली आहे. रात्री उशिरापर्यंत आलिया आणि रणबीर पार्टीच्या मूडमध्ये होते. या पार्टीत रणबीरचे कझीन्सही सहभागी झाले होते. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आलिया, रणबीर, रणबीरचे कझीन अरमान जैन, करिश्मा कपूर, आदर जैन यांच्यासोबत पार्टी करताना दिसले. करिश्मा कपूरने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने फोटो कॅपश्नमध्ये लिहिलं, ‘सैफ आणि करिना यांना मिस करत आहोत.’ करिना कपूर खान आणि सैफ अली खान हे दोघे या पार्टीत गैरहजर होते.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी फिल्मफेअर दरम्यान त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येण्यास सुरूवात झाली होती. नुकतेच आलियानेही लग्नाच्या बातम्यांना पूर्णविराम लावत आपली प्रतिक्रिया नोदवली आहे. 

soul full of sunshine

A post shared by Alia (@aliaabhatt) on

आलिया भट्ट म्हणाली की, “माझी आता लग्न करण्याची इच्छा नाही. पण जेव्हा मी लग्न करण्याचा निर्णय घेईल तेव्हा सगळ्यांना माहिती पडेलचं. मी गेटी गॅलक्सी आणि बांद्रा बँड स्टॉंडवरून सगळ्यांना ओरडून सांगेल की माझे लग्न होणार आहे.” 

मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा आगामी सिनेमा ‘ब्रम्हास्र’मधून प्रथमच एकत्र दिसणार आहेत. तसेच या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन ही प्रमुख भूमिका साकरणार आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रम्हास्र’ हा अॅक्शन फिल्म आहे. हा सूपर नॅचरल पॉवरवर आधारभूत सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे. ब्रम्हास्र चित्रपटातून आपल्याला व्हिएफएक्सचा वापर केलेला आहे. तसेच या चित्रपटात रणबीर आणि आलिया एकत्र दिसणार असल्याने त्यांच्या चाहत्यामध्ये ब्रम्हास्रबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. तसेच आलियाही ब्रम्हास्र रिलीज होण्याची आतूरतेने वाट पाहत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आलिया-रणबीरच्या पार्टीत 'या' जोडीची कुणाला आली फार आठवण? Description: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर रात्री उशिरापर्यंत पार्टी करण्याच्या मूड मध्ये होते. पार्टीचे फोटा व्हायरल होत आहेत. रणबीर आलियाची ही पार्टी आता चर्चेचा विषय बनतं आहे. जाणून घ्या व्हायरल फोटो मागचं सत्य
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
तैमूर करीनाला मॉम नाही तर 'या' नावाने हाक मारतो!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
पाहा पूर्वीपेक्षा किती बदललीए सुहाना खान, हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
Bigg Boss Marathi: आपला मराठी बिग बॉस...बिग बॉस मराठी सीझन १ आणि २च्या स्पर्धकांचा एकत्र जल्लोष
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
[PHOTO] दीड कोटीच्या कारमधून फिरते बाहुबलीमधील 'शिवगामी देवी', जाणून घ्या तिच्याविषयी इंटरेस्टिंग माहिती 
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
KBC 11: हा होता ७ कोटींसाठीचा प्रश्न, मराठी महिलेची KBC मध्ये अभिमानस्पद कामगिरी  
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
[video] रावणाच्या रूपात साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार का ?
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
Mahesh Bhatt B'day: मुलगी पूजासोबत लिप लॉक आणि बरंच काही, वाढदिवसानिमित्त महेश भट्ट यांच्या फिल्मी सफरची झलक
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह
अल्डट स्टार जेसिका जेम्सचा मृत्यू, घरातच सापडला मृतदेह