Alia Bhatt and ranbir kapoor welcome baby girl : "मुलगी झाली हो...", आलिया-रणबीरच्या घरी बाळाचं आगमन

बी टाऊन
Updated Nov 06, 2022 | 13:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Alia bhatt and Ranbir Kapoor welcome Baby girl today: आलिया भट्टने (Alia Bhatt)काही वेळापूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट एका गोंडस मुलीचे आई-बाबा झालेले आहेत. या बातमीनंतर कपूर कुटुंबात जल्लोषाचं वातावरण आहे. आलिया-रणबीरचे चाहतेही खूप खुश झालेले आहेत.

Alia bhatt and Ranbir Kapoor welcome  Baby girl today
आलिया-रणबीरला 'मुलगी झाली हो'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आलिया-रणबीरच्या घरी बाळाचं आगमन
  • रणबीर-आलिया गोंडस मुलीचे आई-बाबा
  • कपूर कुटुंबात लक्ष्मीचं आगमन

Alia Bhatt and ranbir kapoor welcome baby girl : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने  (Alia Bhatt) 6 नोव्हेंबर रोजी दुपारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. 
पहाटेच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) पत्नीसह मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. तेव्हापासूनच कपूर कुटुंबात कोण येणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. अखेर काही वेळापूर्वीच आलियाने एका गोंडस, चिमुकल्या मुलीला जन्म दिलेला आहे. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. (Alia bhatt and Ranbir Kapoor welcome  Baby girl today)

अधिक वाचा : महिला आपल्याच मुलाच्या मुलीची झाली आई, नातीला दिला जन्म


प्रसूतीच्यावेळी रणबीर कपूर आलिया भट्टसोबत होता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी रात्री रणबीर कपूरने आपल्या बिझी शेड्युलमधून ४८ तासांचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. आलियासोबत त्याला या खास क्षणासाठी राहायचे होते. रणबीर कपूरनंतर त्याची आई नीतू कपूरही एनएच रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली. आपल्या सूनेची आणि नातीची काळजी घेण्यासाठी नीतू कपूरही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. 

आलिया भट्टचे वडील आणि नुकतेच आजोबा झालेले महेश भट्ट आपल्या नातीबद्दल खूप आनंदी आहेत. ते म्हणतात हे आमच्या घरचे पहिले नातवंड आहे. मी किती आनंदी आहे हे देखील सांगू शकत नाही. सकाळी रणबीर कपूर आलिया भट्टसोबत रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आला होता. आलिया भट्टला सकाळी साडेसात वाजताच दाखल करण्यात आले. काही वेळापूर्वीच आलियाने सर्वांनाच आनंदाची बातमी दिली. आलियाच्या गोंडस मुलीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आता वाट पाहत आहेत.

अधिक वाचा :  'कांतारा'ची हिंदी सिनेमांना टक्कर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी 14 एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले. लग्नाच्या दोन महिन्यानंतर आलियाने तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. तेव्हापासूनच आलिया तिच्या प्रेग्नंसीबद्दल सतत चर्चेत होती.आता कूपर कुटुंबात आलेल्या या लक्ष्मीच्या आगमनाने सारेच खूप खुश आहेत. 

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 'गंगुबाई काठियावाडी' आणि 'ब्रह्मास्त्र' हे दोन मोठे सिनेमा रिलीज झाले. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.  यानंतर आलिया आता 'हार्ट ऑफ स्टोन' आणि 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा'मध्ये दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी