आलिया भट्टने एअरपोर्टवर कॅरी केली इतकी महागडी बॅग, किंमत जाणून घेऊन व्हाल हैराण

बी टाऊन
Updated Jul 16, 2019 | 23:40 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

नुकतेच आलिया भट्टचे एअरपोर्टवरील काही फोटोज व्हायरल झाले आहेत ज्यात तिच्या हातात स्टायलिश बॅग दिसत आहे. या बॅगची किंमत लाखांच्या घरात आहे.

alia bhatt
आलिया भट्ट 

थोडं पण कामाचं

  • आलियाचा एअरपोर्ट लूक खूप सुंदर
  • आलियाच्या हँडबॅगची किंमत लाखोंचा घरात
  • आलिया लवकरच ब्रम्हास्त्रमध्ये दिसणार

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या जबरदस्त अॅक्टिंगसोबतच तिच्या स्टायलिश लूकसाठीही ओळखली जाते. आलिया त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या कॅज्युअल लूकलाही स्टायलिश बनवते. फॅशनच्या बाबतीतही आलिया कधीच मागे नसते. आपल्या ट्रेंडी लुकने ती नेहमीच साऱ्यांना आकर्षित करून घेते. नुकतेच तिचे एअरपोर्टवरील फोटो समोर आले आहेत यात ती आपली आई सोनी राजदानसोबत दिसत आहे. 

एअरपोर्टवर आलिया एथलेजर लूकमध्ये दिसली होती. ती सुंदर लेवेंडर कलरच्या स्पोर्टी आऊटफिटमध्ये दिसली होती. तिने लेवेंडर पँट्ससोबत व्हाईट प्लेन टँक टॉप घातला होता या लुकला तिने पँटला मॅचिंग जॅकेट घातले होते. या दरम्यान तिने खूप कमी मेकअप केला होता. आलियाने आपले केस सिंपल पोनीटेलने बांधले होते. तिने व्हाईट फ्रेमच्या क्वर्की ग्लासेस आणि व्हाईट शूज घातले होते. मात्र यावेळी तिच्या हातात मस्टर्ड रंगाची बॅग होती याची किंमत ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. 

आलियाची ही लग्जरी बॅग Anya Hindmarch या डिझायनर ब्रँडची आहे. याची किंमत तब्बल १,१९,४२२ रूपये इतकी आहे. ही हँडबॅग अतिशय स्टायलिश आणि लेवेंडर कलरची आहे. 

Mere boyfriend Ke sath gulugulu karengi ??? #aliabhatt

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

♥️

A post shared by Alia ? (@aliaabhatt) on

कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आलिया भट्ट सध्या आपल्या ब्रम्हास्त्र सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात ती पहिल्यांदा आपला रिअल लाईफ बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. या सिनेमात आलिया आणि रणवीर शिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन असणार आहेत. 

याशिवाय आलिया संजय लीला भन्साळी यांच्या इन्शाअल्लाह या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती पहिल्यांदा दबंग स्टार सलमान खानसोबत दिसणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आलिया भट्टने एअरपोर्टवर कॅरी केली इतकी महागडी बॅग, किंमत जाणून घेऊन व्हाल हैराण Description: नुकतेच आलिया भट्टचे एअरपोर्टवरील काही फोटोज व्हायरल झाले आहेत ज्यात तिच्या हातात स्टायलिश बॅग दिसत आहे. या बॅगची किंमत लाखांच्या घरात आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Batla House: जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ला प्रेक्षक पसंती, 5 दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Batla House: जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ला प्रेक्षक पसंती, 5 दिवसात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
पाकिस्तानात गाणाऱ्या मिका सिंगला मनसेचा पाठींबा, पाहा काय म्हटलंय मनसेने
पाकिस्तानात गाणाऱ्या मिका सिंगला मनसेचा पाठींबा, पाहा काय म्हटलंय मनसेने
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स 
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स